18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeलातूरलातूर तालुक्यात १९५ शिक्षक लसीकरणाच्या डोस पासून दूरच !

लातूर तालुक्यात १९५ शिक्षक लसीकरणाच्या डोस पासून दूरच !

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली पासून १६५ शाळा दि. १ डिसेंबर पासून सुरू होणार आहेत. कोरोनाला थोपवण्यासाठी ज्या शिक्षकांनी कोरोना योध्दा म्हणून कोरोनाच्या काळात काम केले. अशा १९५ शिक्षकांनी अद्याप कोरोनाच्या लसीचा एकही डोस घेतला नाही. मग हेच शिक्षक विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन शिकवणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लातूर तालुक्यात सर्व माध्यमाच्या ७०२ शाळा आहेत. तर जिल्हा परिषदेच्या १६५ शाळा आहेत. या शाळा इयत्ता पहिलीपासून दि. १ डिसेंबर पासून सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या सुचना आहेत. लातूर तालुक्यातील ६ हजार ५३६ शिक्षकांनी पहिला कोरोना लसीचा डोस घेतला आहे. तर ५ हजार २९१ शिक्षकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर अद्यापही १९५ शिक्षकांनी कोरोना लसीकरणाचा एकही डोस घेतला नाही. लातूर जिल्हयात तर याही पेक्षा मोठी परिस्थिती आहे. शिक्षकच जर कोरोना लसीकरणाचा डोस घेणार नसतील तर पालक आपल्या पाल्यांना शाळेत कशासाठी पाठवतील असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लातूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिलीपासून शाळा दि. १ डिसेंबर पासून सुरू होणार आहेत. लोक प्रतिनीधी, शिक्षक, तसेच त्याच शाळेत वरच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकडून नव्याने शाळेत येणा-या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात येणार आहे. तसेच अधिकारी व कर्मचा-यांचे शाळा भेटींचे नियोजनही करण्यात येणार असल्याची माहिती लातूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले यांनी सांगीतले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या