26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूरलातूर मनपातील २१ बंधपत्रित आरोग्यसेविकांचे नियमित शासकीय सेवेत समायोजन

लातूर मनपातील २१ बंधपत्रित आरोग्यसेविकांचे नियमित शासकीय सेवेत समायोजन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बंधपत्रावर कार्यरत लातुर महानगरपालीकेमधील २१ बंधपत्रित आरोग्यसेविकांना कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमिवर शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. माया वाठोरे यांनी सुरु केलेल्या दिर्घकालीन लढ्याला यश मिळाले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने २३ नोव्हेंबर रोजी प्रसृत केलेल्या शासन निर्णयानुसार प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज २ अंतर्गत महापालीकेत कार्यरत २१ बंधपत्रित आरोग्यसेविकांसह ३३ अधिकारी, कर्मर्चा­यांना नियमित शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शासननिर्णयामुळे आरोग्यसेविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लातुर महापालीकेत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत २१ आरोग्यसेविका या आर. सी. एच. कार्यक्रमाव्दारे मनपाकडे वर्ग झाल्या होत्या. सन २००६ पासून कार्यरत या आरोग्यसेविका ६ हजार रुपये इतक्या तुटपुंज्या मानधनावर काम करत होत्या. मातृवंदना योजना, आयुष्यमान भारत योजना, साथीचे आजार नियंत्रण, डेंग्यु प्रतिबंधक योजना, गरोदर मातांचे सर्वेक्षण, ० ते ५ वर्ष बालकांचे संगोपन, लसीकरण, माता बाल संगोपन, कुटुंब कल्याण शस्त्रक्रीया योजना, शासन जनजागृती अशा विविध जबाबर्दा­या त्या अत्यल्प मानधनावर निमुटपणे पार पाडत होत्या. कोरोनासारख्या भिषण महामारीच्या संसर्गजन्य आजारामध्येसुध्दा पुर्ण लातुर शहर महानगर पालीका क्षेत्राची जबाबदारी या आरोग्य सेविका पार पाडत होत्या. शासनाकडून त्यांना स्वसंरक्षणासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा सामुग्री यांना देण्यात आली नव्हती.

कुशल कामगार प्रवर्गात मोडणा-या या आरोग्यसेविकांवर शासनाकडून सातत्याने अन्याय होत असल्याने त्यांच्या न्याय मागण्यांसाठी नर्सेस असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. माया वाठोरे यांच्या नेतृत्वात महापालीका आयुक्त ते मुख्यमंत्री अशी विविध निवेदने सातत्याने देवून शासनस्तरावर लक्ष वेधून आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली होती. असोसिएशनच्या निवेदनाची दखल घेवून महापालीका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली होती.

याशिवाय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमिवर केलेली महत्वपुर्ण शिफारस आणि लातुर महापालीकेच्या २९ ऑगष्ट २०१९ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक १०१ मधील बाबीही शासनाच्या लक्षात आणून देण्यात आल्या होत्या. या आरोग्यसेविकांच्या न्याय मागण्यांसाठी असोसिएशनने सुरु केलेल्या दिर्घ लढ्यला अखेर यश मिळाले आहे. गेल्या २००६ पासून इमानेइतबारे काम करणा-या तसेच कोविड लढ्यात जोखीम पत्करुन नागरीकांचा जिव वाचविर्णा­या आरोग्यसेविकांना अखेर शासनाने महापालीकेच्या आरोग्यसेवेत नियमित समायोजन केले आहे.

पालकमंत्री अमित देशमुख यांचे आभार
लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात मागील अनेक वर्षांपासून मानधन तत्वावर कार्यरत असणारे ३ डॉक्टर्स, २५ नर्स आणि ३ डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांना सेवेत कायम करण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. कोरोना काळात या सर्वांनी उत्कृष्ट कार्य केलेले आहे. त्याची दखल घेऊन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे या कर्मचा-यांना सेवेत कायम सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबद्दल पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या