25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरलातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा पिवळसर रंग नाहीसा

लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा पिवळसर रंग नाहीसा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरास होणा-या पिण्याच्या पाण्याला मागील काही दिवसांपासून पिवळसर येत असल्याचे दिसून येत होते, मात्र लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने तज्ञांच्या सल्ल्याने पी ए सी ( पॉली अल्युमिनियम क्लोराईड) चा वापर करण्यात येत असून आता रंग नाहिसा झालेला आहे. लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आज मनपा अधिका-यांच्या समवेत प्रभाग ११ मधील विशालनगर भागात भेट देवून पाहणी केली व नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, यावेळी नागरिकांची शंका दूर व्हावी यासाठी महापौरांनी स्वत: थेट नळाद्वारे आलेले पाणी पिऊन पाहिले व पाणी पूर्णत: योग्य असल्याचा निर्वाळा दिला.

लातूर शहरास पुरवठा करण्यात येत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या रंग पिवळसर येत असल्याचे दिसून येत होते. शहरास पाणी पुरवठा करणा-या धनेगाव धरण पात्रातून कॅनलद्वारे पाणी सोडल्यानंतर मागील बाजूचे साठून राहिलेले पाणी पुढे येते आणि उपसा केल्यानंतर पिवळसर रंग पाण्याला येतो. पावसाळ्यात, हिवाळ्यात पाण्यामध्ये शेवाळ निर्माण झालेले असते तसेच सध्या वाढलेल्या तापमानामुळे पाण्याची पातळी घटत जाते व विरघळलेले ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे पाण्यामध्ये शेवाळ निर्मिती प्रक्रिया जलद गतीने होते. शेवाळमिश्रीत पाणी क्लोरीनच्या संपर्कात आल्याने कधीकधी पाण्याचा पिवळसर रंग येतो. मागील काळापासून दरवेळी हे घडताना दिसून येत होता. पाणी पिण्यास अपायकारक नसून केवळ रंग बदललेला दिसून येत होता. यावर आवश्यक असणारे पॉली अल्युमिनयम क्लोराईड या केमिकल वापर मनपाने केला आहे. इतर वेळी जलशुध्दीकरण केंद्र येथे तुरटी, ब्लिंिचग, क्लोरीन वापरण्यात येते. मागील काही दिवसांपूर्वीपासून हे केमिकल वापरण्यात येत आहे. या पाण्याची जलकुंभनिहाय पाणी चाचणी घेतली असता हे पाणी पिण्यायोग्य असल्याचे दिसून आले आहे.

जलशुध्दीकरण केंद्र येथे पाण्याचा रंग नाहिसा होत होता परंतु शहरातील मोठ्या पिण्याच्या टाकी येथे दोन – तीन तास पाणी साठून राहिल्यास पुन्हा रंग दिसून येत होता, तज्ञांच्या सल्ल्याने पी ए सी केमिकल ची मात्रा वाढविण्यात आली असून आता शहरात केल्या जाणा-या पिण्याच्या पाण्याचा रंग नाहिसा झालेला आहे. आज महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत मनपा पाणी पुरवठा विभागाचे अभियंता विजय चव्हाण, साधू कांबळे, माजी नगरसेवक महादेव बरुरे उपस्थिती होते. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आज मनपा अधिका-यांच्या समवेत प्रभाग ११ मधील विशालनगर भागात भेट देवून पाहणी केली व नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, यावेळी नागरिकांची शंका दूर व्हावी यासाठी महापौरांनी स्वत: थेट नळाद्वारे आलेले पाणी पिऊन पाहिले व पाणी पूर्णत: योग्य असल्याचा निर्वाळा दिला.

पालकमंत्री यांनी दखल घेऊन केल्या सूचना
राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शहरास केल्या जाणा-या पिण्याच्या पाण्यास येत असलेला पिवळसर रंगाबाबत दखल घेत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या