22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeलातूरलातूर शहरातील ३३८१५ व्यक्ती जोखीम गटात

लातूर शहरातील ३३८१५ व्यक्ती जोखीम गटात

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरामध्ये २०१७ ते २०२२ या ५ वर्षे कालावधीतील क्षयरुग्ण या गटातील ११६०. मागील दोन वर्षातील कोविड-१९ पॉझिटीव्ह रुग्ण या गटातील २३५२०. कुपोषित बालक, व्यक्ति, एचआयव्हीबाधित व्यक्ति १००, मधुमेह असलेले रुग्ण ९०३५ असे एकूण ३३८१५ रुग्ण, व्यक्ति जोखीम गटात येतात. त्या अनुषंगाने दि. १३ एप्रिलपर्यंत या सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. क्षयरोगासाठी जोखमीच्या गटातील व्यक्तींची यादी तयार करण्यात आलेली असून त्या-त्या भागातील आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांचेकडे देण्यात आली आहे.

भारत सरकारने सन २००५ पर्यत क्षयरोगाचे दुरीकरण करण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. याअंतर्गत भारत सरकारतर्फे ‘क्षयरोगमुक्त भारत अभियान’ सुरु करण्यात आले आहे. २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्तीचे ध्येय साध्य करण्यसाठी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत देणा-या सेवांचे, निर्देशांकाचे विवीध स्तरावर योग्य नियोजन व प्रभावी सनियंत्रण करणे आवश्यक आहे. तरी यासाठी क्षयरोगासाठी जोखमीचे गट निश्चित करून या जोखमीच्या गटातील रुग्णांची क्षयरोगासाठी तपासणी करण्याची मोहीम चालू करण्यात आली आहे. या अंतर्गत खालीलप्रमाणे क्षयरोगासाठी ४ जोखमीचे गट निश्चित करण्यात आलेलेल आहेत.

२०१७ ते २०२२ या ५ वर्षे कालावधीतीलं क्षयरुग्ण, मागील दोन वर्षातील कोविड-१९ पॉझिटीव्ह रुग्ण, कुपोषित बालक, व्यक्ति, एचआयव्ही बाधित व्यक्ति टेक्निकला, मधुमेह असलेले रुग्ण. या ४ जोखमीच्या गटातील नागरिकांना क्षयरोगाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी या जोखमीच्या गटातील सर्व नागरिकांची क्षयरोगासाठी तपासणी करण्यात येणार असून लक्षणे आढळून येणाी-या रुग्णांची थुंकीनमूने तसेच पुढील टप्प्यात एक्स रे तपासणी करण्यात येणार आहे. तरी या जोखीम गटातील व्यक्तींनी क्षयरोगमुक्ती अभियानासाठी सहकार्य करावे व आपल्या घरी येणा-या आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करावे व थुंकीनमूना तपासणी करून घ्यावी. कींवा नजिकच्या मनपा प्रा.ना.आ.केंद्र येथे जाऊन थुंकीनमूना तपासणी करावी. व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे एक्स रे तपासणी करून घ्यावी असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या