औसा : प्रतिनिधी
औसा विधानसभा मतदारसंघातील लामजना, किल्लारी व कासारसिरसी याठिकाणी बस स्थानक उभारणीसाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तिन्ही बसस्थानकांना मंजुरी देत लामजना बसस्थानक पुनर्बांधणी कामाला प्रशासकीय मंजुरी दिली होती. याच बसस्थानकाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून या कामाचा आढावा दि. १२ एप्रिल रोजी आमदार पवार यांनी घेतला. सदरील बस स्थानकाचे लोकार्पण मे च्या पहिल्या आठवड्यात करण्याचा मानस असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पाठपुरावा केला. या अनुषंगाने ३ जून २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार रावते यांच्या शासकीय निवासस्थानी आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत औसा, लामजना व कासार सिरसी या बसस्थानकांना मंजुरी देत. लामजना बसस्थानकाला १ कोटी ५६ लाख निधीचा समावेश आहे. त्यानुसार २२ जूनला लामजना बसस्थानक पुनर्बांधणी कामास प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली. लामजना बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात असून ३० एप्रिलपर्यंत उर्वरित काम पूर्ण होणार आहे. परिवहनमंत्री अनिल परब व पालकमंत्री अमित देशमुख यांची वेळ घेण्यात येणार आहे.
औसा आणि लामजना ही दोन्ही बसस्थानके लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. कासार सिरसी बसस्थानकाचे काम सुद्धा फेरनिविदा प्रक्रिया राबवून लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.