18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeलातूरलोकनेते विलासराव देशमुख लातूर भुषण पुरस्काराने डॉ. धर्मवीर भारती सन्मानित

लोकनेते विलासराव देशमुख लातूर भुषण पुरस्काराने डॉ. धर्मवीर भारती सन्मानित

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे राज्यस्तरीय अधिवेशन लातूर शहरातील दयानंद सभागृहात हजारो पत्रकाराच्या उपस्थित संपन्न झाले. या कार्यक्रमात सामाजिक व बांधकाम क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय केलेल्या कार्याची दखल घेऊन निश्चल पुरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. धर्मवीर भारती यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने लोकनेते विलासराव देशमुख लातूर भूषण पुरस्काराने जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, राष्ट्रसंत ह.भ.प एकनाथ महाराज, जेष्ट पत्रकार संजय भोकरे, वसंत मुंढे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा निर्माण करणा-या मान्यवरांचा लोकनेते विलासराव देशमुख टाँपटेन लातुर भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. डॉ. धर्मवीर भारती यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांना लोकनेते विलासराव देशमुख टाँपटेन लातुर भूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. याही पुर्वी डॉ. धर्मवीर भारती यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव कामाबदल विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदरील सोहळयासाठी पत्रकार बांधवांची मराठवाडयातुन मोठया संख्येने उपस्थिती होती. हा पुरस्कार प्रधान झाल्याबदल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या