26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरलोकशाहीत स्वत:च्या हक्कासोबत कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे

लोकशाहीत स्वत:च्या हक्कासोबत कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे

एकमत ऑनलाईन

उदगीर : प्रतिनिधी
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राज्य घटनेतील लोकशाही मुल्यांच्या आधारे देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. परंतु, आजही सामाजिक क्षेत्रात महिलांची प्रगती हवी त्या प्रमाणात झाली नाही. महिलांना स्वंयपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे. तथापि, लोकशाहीत हक्कासोबतच कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती ­ निलम गो-हे यांनी आज उदगीर येथे केल.

अखिल भारतीय मराठी साहित्य ९५ व्या समेलनात उदगीर येथील महाराष्ट्र उदगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणातील ना.य.डोळे व्यासपीठावर आयाजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव: काय कमावले? काय गमावले? या विषयावरील परिसंवादात श्रीमती गो-हे बोलत होत्या. यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत सासणे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे, पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयाचे डॉ. राजेश कर्पे आदी सहभागी झाले होते.

श्रीमती गो-हे म्हणाल्या की, स्वातंत्र्यपूर्वी काळात गरिब, दलित स्त्रिया यांच्यावर बरीच बंधने होती. स्वातंर्त्य प्राप्तीनंतर देशाने बरीच प्रगती केली. कांही ­ठिकाणी स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण होताना दिसते. परंतु, कांही प्रमाणात आजही स्त्रियांना स्वत:चे निर्णय घेण्याचे हक्क नाहीत. कुटूंबांतही घरातील पुरुष कुटूंब प्रमुख म्हणेल त्या प्रमाणेच वागावे लागते. तेव्हा प्रत्येक पुरुष, महिलांनींही स्वत: च्या हक्कासोबत इतरांचे स्वातंर्त्य ­अबाधीत राहून त्यांची प्रगती साधली जाईल यासाठी स्वत:च्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे.

कोरोना काळात महिलांना कौटूबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागले. तेंव्हा महिलां, मुलींसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना सुरक्षीतता व संरक्षण मिळणार आहे. तसेच आज समाज माध्यमात क्रांती होत असतांना नवी पिढीही आपल्या हक्कांबाबत जागृत होवून प्रगती करीत आहेत. तर काही ठिकाणी संवेदन­शील घटना घडतांना कर्तव्य सोडून त्याचे ­ चित्रीकरण केले जाते. यातून आपण संवेदना गमावली आहे हे दिसून येते. तेंव्हा प्रत्येक नारिकांनी लोकशाहीतील स्वातंर्त्याचे मुल्य जपत स्वंय शीस्त बाळगून जबाबदार झाले पाहिजे, असे श्रीमती ­ निलमताई गो-हे म्हणाल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या