22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरलोकसंख्येच्या तीन पट वृक्षांची लागवड होणार

लोकसंख्येच्या तीन पट वृक्षांची लागवड होणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी ५ जून या पर्यावरण दिनापासून वृक्ष लागवडीस सुरूवात होते. त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांच्या मार्फत यावर्षी ५३ लाख ३९ हजार २४४ वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे. ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात लोकसंख्येच्या तीन पट वृक्षांची लागवड होणार आहे.

महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र हे अभियान २०२० पासून सुरू केले आहे. या अभियानाच्यातंर्गत गेल्यावर्षीही वृक्ष लागवड लातूर जिल्हयात करण्यात आली आहे. लातूर जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या तीन पट वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यावर्षीही लातूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागांच्या मार्फत ५३ लाख ३९ हजार २४४ वृक्षांची लागवड दि. ५ जून पासून सुरू करण्यात आली आहे.

लातूर तालुक्यात सर्वाधीक वृक्ष लागवड होणार
लातूर जिल्हयातील १० पंचायत समित्यातंर्गत असलेल्या गावांना लोकसंख्येच्या आधारावर वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात सर्वाधीक लातूर तालुक्यातला ९ लाख १ हजार ५९३ वृक्षलागवडचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. निलंगा तालुक्यास ८ लाख ६८ हजार ४९४, औसा तालुक्यास ८ लाख २५ हजार ६३, उदगीर तालुक्यास ६ लाख ७ हजार ५४८, अहमदपूर तालुक्यास ५ लाख ७७ हजार ४५८, चाकूर तालुक्यास ४ लाख ७४ हजार ५३४, रेणापूर तालुक्यास ३ लाख ७२ हजार ७२३, देवणी तालुक्यास २ लाख ५४ हजार ९७, जळकोट तालुक्यास २ लाख ३५ हजार ६११, तर शिरूर अनंतपाळ तालुक्यास २ लाख २२ हजार १२३ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

रोपे खरेदीसाठी ग्रामपंचायतींना १५ लाख रूपये मिळणार
लातूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र हे अभियानातंर्गत यावर्षी ५३ लाख ३९ हजार २४४ वड, पिंपळ, चिंच आदी वृक्षांची लागवड ग्रमापंचायतीच्या परिसरात होणार आहे. जिल्हयातील ग्रामपंचायतींना रोपे खरेदी करण्यासाठी पंचायत विभागाच्याकडून १३ लाख रूपये मिळणार आहेत. यात मोठया पंचायत समितींना १ लाख ५० हजार रूपये व लहान पंचायत समित्यांना १ लाख रूपये दिले जाणार असल्याची माहिती लातूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या