26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरवलांडी येथे जुगार अड्डयांवर पोलिसांची धाड

वलांडी येथे जुगार अड्डयांवर पोलिसांची धाड

एकमत ऑनलाईन

देवणी : देवणी तालुक्यातील वलांडी लगत असलेल्या जवळगा मोडवरील जुगार अड्यावर लातूर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत सोमवारी दि. ४ जून रोजी पावणे चार वाजण्याच्या सुमारास धाड टाकून जुगाराचे साहित्य,
मोबाईल व रोख रक्कम ७ हजार १४० रुपये जप्त करून देवणी पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वलांडी लगत असलेल्या जवळगा मोडवरील पानटप्परीवर पोलीस मुख्यालय लातूर सलग्न पोलीस अधिक्षक यांच्या विशेष पथकाने धाड टाकून नमूद आरोपींने स्वत:च्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन कल्याण नावाचा जुगाराच्या आकड्यावर खेळवित असताना व बुकी मालक शफीक सौदागर यांना देत असल्याचे सांगितले आहे. तसेच जुगाराचे साहित्य व जमवलेली रोख रक्कम ७ हजार १४० रुपये मिळून आले.

या प्रकरणी लातूर पोलीस विशेष पथकातील पोलीस शिपाई विठ्ठल व्यंकट पवार यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १६३/२०२२ कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे विश्वनाथ बस्वराज बनाळे व शफीक सौदागर दोघेही राहणार वलांडी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डोंगरे हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या