लातूर : प्रतिनिधी
सहकारात सोसायटयांकडे शेतक-यांचा आर्थिक कणा म्हणून पाहिले जाते. जिल्हयात सोसायटयांच्या निवडणूकीचा अंतीम पाचवा टप्पा राबविला जात आहे. या टप्यात ५३ विविध कार्यकारी सेवा सोसायटयांच्या निवडणूका होत असून असून त्यासाठी शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सोसाटीच्या निवडणूकीसाठी अर्ज भरण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी दिसून आली.
लातूर जिल्हयात ५८५ विविध कार्यकारी सेवा सोसायटया आहेत. ५८५ पैकी ५३२ सोसायटयांच्या निवडणूका चार टप्यात पूर्ण झाल्या आहेत. तर शेवटच्या पाचव्या टप्प्यात ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत संपणा-या ५३ विक़ा.से. सोसायटयांचा समावेश आहे. या ५३ विक़ा.से. सोसायटयांसाठी शुक्रवार हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. लातूर येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अर्ज सादर करण्यासाठी सोयायटयांच्या सभासदांची धावपळ सुरू होती.
जिल्हयात नोंदणीकृत १ हजार ८६० विविध कार्यकारी सेवा सोसायटया, मजूर संस्था, पतसंस्था, नागरी पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, स्वयं रोजगार संस्था आहेत. त्यापैकी ९४७ संस्थांच्या निवडणूका पूर्ण झाल्या आहेत. तर १७० संस्थांच्या सध्या निवडणूका होत असून त्यात ५३ विक़ा.से. सोसायटयांचा समावेश आहे. तर ३८७ संस्थांच्या निवडणूका घ्यावयाच्या आहेत.