21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरविकासरत्न विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३०६ रुग्णालयांत महाआरोग्य शिबिर

विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३०६ रुग्णालयांत महाआरोग्य शिबिर

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या जनसेवेचा वसा पुढे कायम चालू ठेवून त्यांना ख-या अर्थाने आदरांजली अर्पण करण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इंडियन मेडिकल असोसिएशन, लातूर, निमा, इंडियन डेंटल, होमिओपॅथी असोसिएशन आणि विलासराव देशमुख फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर आज दि. १४ ऑगस्ट रोजी लातूर शहर व परिसरात जवळपास ३०६ रुग्णालयात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लातूर शहर आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास हा विकासाचा मूलमंत्र घेऊन राजकीय कारकीर्द गाजविणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांनी सर्वसामान्य जनतेला सहजगत्या सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले. यातून लातूर जिल्ह्यात शिक्षण, कृषी, सहकार, आरोग्य या क्षेत्रात अनेक पॅटर्न निर्माण झाले. लातूरला शिक्षण, आरोग्य तसेच औद्योगिक केंद्र म्हणून नावारुपास आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून सामाजिक कार्यातून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या स्मृतिदिनी इंडियन मेडिकल असोसिएशन, लातूर, निमा, इंडियन डेंटल, होमिओपॅथी असोसिएशन आणि विलासराव देशमुख फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर सन २०१४ पासून सातत्याने आयोजित करण्यात येत आहे. एकाच दिवशी ३०६ पेक्षा अधिक रुग्णालयात सर्वसामान्यांसाठी मोफत आणि सवलतीच्या दरात आरोग्यसेवा देणारा हा देशातील ऐकमेव उपक्रम ठरतो आहे.

या वर्षीही इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर, अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, सचिव डॉ. मुकुंद भिसे, निमाचे डॉ. दयानंद मोटेगावकर, इंडियन डेंटल डॉ. धनराज शितोळे, होमिओपॅथी असोसिएशन डॉ. पुरुषोत्तम दरक या संघटनाचे सर्व पदाधिकारी त्याच बरोबर डॉ. अशोक पोद्दार, डॉ. अजय जाधव, डॉ. हनुमंत किणीकर, डॉ. संजय पौळ, डॉ. दिनेश नवगिरे यांच्यासह शहरातील वरिष्ठ डॉक्टर मंडळी हे सदरील महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येत आहे. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून या महाआरोग्य शिबिरात आयएमएचे, दंतवैद्यकीय, आयुर्वेदिक, होमिओपॅथीक असे एकूण ३०६ रुग्णालये सहभागी झाले आहेत.

तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून स्त्री रुग्णालय, लातूर, ग्रामीण रुग्णालय बाभळगाव, ग्रामीण रुग्णालय मुरुड, ग्रामीण रुग्णालय रेणापूर येथे स्त्रियांचे कर्करोगनिदान व उपचार, असे ३०६ पेक्षा अधिक रुग्णालयांत लातूर शहर व परिसरात मोफत तपसणी होणार आहे. यानिमित्ताने हजारोंच्या संख्येने तज्ज्ञ डॉक्टर रुग्णसेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. या ठिकाणी प्रयोगशाळेतील तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाच्या काही तपासणी मोफत तर काही तपासणी व उपचार सवलतीच्या दरात होणार आहेत. दुर्धर आजार असलेल्या सामान्य परिस्थितीत असलेल्या रुग्णांना फायदा होणार आहे. या महाआरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

श्रेष्ठदान अवयवदान : सद्य: स्थितीत अवयवदानाला आलेले महत्त्व आणि गरज लक्षात घेऊन विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या वर्षीपासून इंडियन मेडिकल असोसिएशन, लातूर, निमा, इंडियन डेंटल, होमिओपॅथी असोसिएशन आणि विलासराव देशमुख फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान संकल्प मोहिमेचा शुभारंभ होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. यासाठी आवश्यक असणा-या सोयीसुवीधा लातूरमध्ये उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न केले जातील, असेही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या