लातूर : प्रतिनिधी
लातूर येथील दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने एसएससी बोर्ड परीक्षेत ९५ टक्के पेक्षा अधिक गुण असणा-या विद्यार्थ्यांना सीए फाउंडेशन कोर्स विनामूल्य देण्याचे निश्चित केले आहे. या कोर्स मधील विद्यार्थ्यांना अध्यापन व मार्गदर्शन करण्यासाठी विषय तज्ञ व सीएची नियुक्ती करण्यात आली आहे. या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.
दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील इयत्ता अकरावी वर्गाची प्रवेश प्रक्रियेमध्ये दि. १ जुलै रोजी चेकलिस्ट मधील दुरुस्ती करणे. दि.२ जुलै पहिली प्रवेश यादी, प्रवेश कालावधी २ ते ६ जुलै, दि. ७ जुलै रोजी दुसरी प्रवेश यादी, प्रवेश कालावधी ७ ते १३ जुलै, दि. १४ जुलै रोजी तिसरी प्रवेश यादी (जागा रिक्त असल्यास) प्रवेश कालावधी १४ ते १६ जुलै प्रत्येक प्रवेश यादीतील कट ऑफ महाविद्यालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. सर्व यादीतील प्रवेश ऑफलाइन पद्धतीनेच होतील. तसेच सीबीएसइचा निकाल लागल्यानंतर पुढे १० दिवस त्यांची नोंदणी व प्रवेश प्रक्रिया चालू राहील. सीए फाउंडेशन व करिअर बिल्डिंग कोर्ससाठी मर्यादित प्रवेश असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी तात्काळ प्रवेश घ्यावा, असे अवाहन महाविद्यालयांच्या वतीने करण्यात आले आहे.