22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरवीज ग्राहकांना महावितरणचा ‘सुरक्षा’ शॉक!

वीज ग्राहकांना महावितरणचा ‘सुरक्षा’ शॉक!

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
एकीकडे वीजेचा लपंडाव सुरु आहे. उन्हाचा पारा ४० अंशावर आहे. त्यातच महावितरणने वीज ग्राहकांना सुरक्षा शॉक दिला आहे. वीजबिलासोबतच वाढीव सुरक्षा टेव बील दिल्याने नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्यमान महिन्याच्या वीज बिलासोबत वीज देयक वेगळे आणि सुरक्षत्त ठेव देयक वेगळे, असे एकाच वेळी दोन-दोन देयके लातूर शहरातील वीज ग्राहकांच्या हाती पडली आहेत. त्यामुळे नागरीक संभ्रमात पडले आहेत.

नियमित वीज भरुनही जादा वीजबिल कशाचे हेच लवकर लक्षात न आल्याने काही नागरीकांनी महावितरणच्या वीजबिलाचे वितरण करणा-यांसोबत हुज्जत घातली. काहींनी हे वाढीव वीजबिल कशाचे आहे, याची साहनिशा करण्यासाठी कळत्यांशी संपर्क साधून माहिती घेतली. आता कसली सुरक्षा ठेव महावितरण घेत आहे, असा सवाल उपस्थित करीत आहेत. महावितरणने वीज ग्राहकांना हा सुरक्षा शॉक दिल्याचे अनेक ग्राहाकांचे म्हणणे आहे. दरम्यान वीज ग्राहकांनी विद्यमान महिन्याचे वीजबिल अगोदर भरावे आणि त्यानंतर काही दिवसांनी सुरक्षा ठेव बील भरले तरी चालेल, असे महावितरणच्या सुत्रांकडून सांगण्यात आल.े

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. कोळसा टंचाईमुळे वीज उत्पादनात घट झाली परिणामी वीजेचे भारनियमन केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा वृत्तांनी नागरिकांना अधीच चिंतेत टाकले आहे. महावितरणच्या लातूर परिमंडळाने दोन-तीन दिवसांपासून दिवसातून दोन ते तीन वेळा तासन्तास वीज पुरवठा खंडीत केला जातो की, बंद केला जातो हेच मुळी कळत नाही. या संदर्भाने माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता विजेचे भारनियमनच आहे परंतू, माझे नाव न सांगता वरिष्ठ अधिका-यांकडून माहिती द्यावी, असे सांगण्यात येते. वरिष्ठ अधिकारी मात्र या विषयी स्पष्टपणे अद्याप बोलत नाहीत. भारनियमन असेल तर संबंधीत यंत्रणेने तसे स्पष्ट करुन त्या त्या फिडरअंतर्गत वीजच्या भारनियमाचे वेळापत्रक जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र तसे न करता किंवा नागरिकांना कसलीही माहिती न देता केव्हाही वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.

त्यातच आता सुरक्षा ठेवच्या नावाखाली हजारो रुपयांचे बिले महावितरणने नागरिकांच्या हाती दिली आहेत. त्यामुळे नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. वीज जोडणी देण्यात आली तेव्हा जेवढी अनामत रक्कम भरणे आवश्यक होते , तेवढी अनामत रक्कम ग्राहकांनी भरली आहे. त्या अनामत रकमेतून महावितरणकडून सुरक्षा ठेव घेण्यात आली आहे. तरीही विद्यमान महिन्याच्या वीज बिलासोबत वाढीव सुरक्षा ठेव बील देण्यात आले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना ऐन उन्हाळ्यात महावितरणने शॉक दिला आहे. त्यामुळे वीज ग्राहकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या