22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeलातूरवीज टंचाईत जळकोटमध्ये मात्र दिवसा पथदिवे सुरू

वीज टंचाईत जळकोटमध्ये मात्र दिवसा पथदिवे सुरू

एकमत ऑनलाईन

जळकोट : ओमकार सोनटक्के
राज्यामध्ये मोठी विजेची मागणी वाढलेली आहे. यामुळेच संपूर्ण राज्यभर विजेची टंचाई आहे. यामुळे शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना भार नियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. राज्य सरकार एकीकडे वीज नाही म्हणून भार नियमन करत आहे तर दुसरीकडे जळकोट नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे दररोज दिवसा पथदिवे सुरू आहेत. यामुळे वीज बचतीचे धोरण नगरपंचायत स्वीकारणार का असा सवालही सामान्य नागरिक विचारत आहेत.

उन्हामुळे विजेची मागणी वाढली. याचाच परिणाम राज्यावर मोठे विजेचे संकट ओढवले आहे .राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी भारनियमनाचा सामना करावा लागेल असे सांगितले आहे. अनेक समाज माध्यमांवर कोणत्या शहरामध्ये किती भारनियमन कोणत्या विभागात किती भारनियमन याचे वेळापत्रकच पडले होते. भारनियमनाचे सत्र सुरू
झाले आहे . भारनियमनामुळे जळकोट शहरात लाईट कधी येऊ लागली आणि कधी चालली याचा पत्ता नागरिकांना लागेनासा झाला आहे. ग्रामीण भागात तर एवढे वेळेस वीज जात आहे की नागरिकही या भारनियमनाला आता कंटाळत आहेत विशेष म्हणजे ज्या शेतक-याजवळ पिकांना पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध आहे अशा शेतक-यांनी आपल्या शेतात उसाची लागवड केली आहे. अनेक शेतक-यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे परंतु वारंवार जाणा-या विजेमुळे शेतक-यानाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी वीज आहे परंतु व्यवस्थित दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे.

एकीकडे राज्य सरकार कडून विजेची बचत करा , विजेचा वापर कमी करा, गरज असेल तरच घरामधील विजेचे स्त्रोत सुरू करा , अशा सूचना दिल्या जातात परंतु अशा सूचनांकडे जळकोट नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे उन्हाळ्यात विजेअभावी नागरिकांना भारनियमन सहन करावे लागत आहे मात्र दुसरीकडे जळकोट नगर पंचायत हद्दीत दिवसाही हे पथदिवे सुरूच असतात. यामुळे एक प्रकारे विजेचा अपव्यय केला जात असल्याचे दिसून येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या