लातूर : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आयोजित लातूर येथील विवेकानंदपुरम शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिवंगत डॉ. सयाजीराव सौताडेकर यांच्या वीरपत्नी श्रीमती गंगाबाई सयाजीराव सौताडेकर यांचा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे वाकून दर्शन घेतले.
याप्रसंगी मंचावर माजी मंत्री आ. गिरीश बापट, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, राहुल केंद्रे, नगरसेविका रागिनी यादव, विवेक सौताडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.