21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरशंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा

शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून एकरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे मागणी जिल्हाधिकारी यांना संभाजी सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. वर्षानुवर्षे शेतकरी निसर्गाच्या व सरकारच्या लहरिपणामुळे उध्दवस्त होत आहे. कधी लष्कर आळी तर कधी कोरोनासारखी महामारी तर आता शंखी गोगलगाईने आख्या शेतातील पिके उध्दवस्त करुन शेतक-यांना उध्दवस्त केले आहे. त्यामुळे शेतक-यांना दुबार पेरणी करुनसुध्दा सततच्या पावसामुळे पिके उध्दवस्त झाली आहेत. म्हणून शेतकरी मोठया आर्थीक संकटात सापडला आहे.

म्हणून मुख्यमंर्त्र्यांना दि. २२ जुलै रोजी निवेदन देऊन शेतक-यांना एकरी ५० हजार रूपयांची मदत करण्याची विनंती केली होती. अद्यापपर्यंत सरकारने कोणतीही मदत जाहीर केली नाही. म्हणुन येत्या दि. १० ऑगस्ट रोजी हनुमान चौक, लातूर या ठिकाणी संभाजी सेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सभाजी सेनेच्यावतीने देण्यात आला. यावेळी संभाजी सेनेचे अध्यक्ष सुधाकर माने, संभाजी सेनेचे नेते धर्मराज पवार, जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष मदन बोडके, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत माने, सचिव बालाजी घोडके, लखन साबळे, एकनाथ काळे, प्रसाद पवार, अमोल कांदे आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या