29.5 C
Latur
Tuesday, March 28, 2023
Homeलातूरशिक्षक पतसंस्थेसाठी १९ फेब्रुवारीस मतदान

शिक्षक पतसंस्थेसाठी १९ फेब्रुवारीस मतदान

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिक्षक पतसंस्थेच्यानिवडणुकीत रणधुमाळी सुरू असून या शिक्षक पतसंस्थेच्या निवडणूक प्रचारात शिक्षक दंग झाले आहेत.११ संचालक पदासाठी २६ उमेदवार निवडणुकीच्या ंिरगणात उभे आहेत. यासाठी १९ फेब्रुवारीला मतदान होणार असून संचालक होण्यासाठी गुरुजींची धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. शिक्षक नेते गोंिवदराव हंद्राळे यांच्या सत्यम शिवम सुंदरम तर विजयकुमार कोरे यांच्या सत्यमेव जयते या दोन पॅनलमध्ये दुरंगी लढत होणार असून यात चार अपक्ष उमेदवार ही निवडणूक ंिरगणात उतरले आहेत. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भुमिका निभावणारे गुरुजी निवडून येण्यासाठी मतांची जुळवाजुळव करीत आहेत.

दरम्यान लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया जरी महत्त्वाची असली तरी ती एकविचाराने टाळून इतरांपुढे आदर्श निर्माण करता येतो. तसा प्रयत्नही यावेळी झाला मात्र त्यात यश आले नाही. शिक्षक बँकेची ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर नव्या पिढीसमोर एक चांगला आदर्श निर्माण झाला असता. स्वत: सह पॅनल निवडून आणण्यासाठी गुरुजींनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली असल्याने गुरुजीही पक्के राजकारणी झालेले दिसत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या