25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरशिरुर अनंतपाळ तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अनेक शहराला जोडणा-या अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.जागोजागी खड्डे पडले असून त्यात खडी उघडी पडल्याने नागरिक व वाहनधारकातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून यांकडे संबंधित विभाग यांकडे लक्ष देत रस्त्यांची दुरुस्ती करावी,अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.

पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गंत प्रत्येक गावांना शहराला जोडणारे रस्ते काही वर्षा अगोदर झाले तर काही रस्ते आज ही अनेक रस्ते दूरूस्तीच्या प्रतक्षिेत आहेत.त्यात गेल्या अनेक वर्षांपासून याची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील रस्त्याची झालेल्या दैन्यावस्थेकडे कोणीही लक्ष देत नसल्याचा प्रकार सध्या पाहायला मिळत आहे.

दरम्यान तालुक्याचे ठिकाण असलेल्या शिरूर अनंतपाळ शहराला जोडणा-या अनेक गावच्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्ते पूर्णत: उखडल्याने नागरिकांचे आणि वाहनचालकांचे मोठे हाल होत आहेत. जवळची मोठी बाजारपेठ, शाळा,महाविद्यालयासह सर्व शासकीय कार्यालये ही शिरूर अनंतपाळ शहरात असल्याने दररोज तालुक्यातील हजारो विद्याथ्यासह नागरिकांना ये-जा केल्याशिवाय या लोकांना पर्यायच नाही.

तालुक्यातील शिरूर अनंतपाळ ते तळेगाव दे., शिरूर अनंतपाळ ते होनमाळ ,बिबराळ ते उजेड, बेवनाळ ते डोंगरगाव, तळेगाव बोरी ते लातूर मुख्य रस्ता. बिबराळ -राणी अंकुलगा ते साकोळ, कारेवाडी ते येरोळ, उजेड ते बोरी, पांढरवाडी पाटी ते येरोळ मोड, पांढरवाडी पाटी ते दैठणा, सावरगाव ते बोरी मुख्य रस्ता, रापका ते हिप्पळगाव, शिरूर अनंतपाळ ते धामणगाव अशा अनेक गावाच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

अनेक रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिक त्रस्त झाले असून आजारी लोकांची तर मोठी परवड होत आहे. रुग्णांना तात्काळ सेवा मिळणे, गरोदर महिला,वृद्धांना घेऊन जाणे या रस्त्यामुळे अवघड बनले असून अपघात ही घडत आहेत. या खराब रस्त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून संबंधित विभागाने यांकडे लक्ष देऊन तात्काळ रस्ते दुरुस्ती करावेत अशी मागणी केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या