23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरशिरुर अनंतपाळ तालुक्यात कुष्ठरोग, क्षयरोग सर्व्हेे सुरू

शिरुर अनंतपाळ तालुक्यात कुष्ठरोग, क्षयरोग सर्व्हेे सुरू

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्वेक्षणात कुष्ठरोग व क्षयरोग उपचारांबाबत रुग्णांना मार्गदर्शन करण्यात येणार असून या सर्वेक्षणाची शहरातील समतानगर येथून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख,नगराध्यक्षा सौ मायावती धुमाळे, सौ सुषमाताई मठपती, नगरसेवक अनंत काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वसीम पटेल, डॉ. तेलंग, क्षयरोग पर्यवेक्षक अविनाश उपस्थित होते. तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन मोहीम सुरू झाली.

या मोहिमेंतर्गत प्रत्येक गावात जाऊन पथक दररोज २० घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन रोगांचे सर्वेक्षण करणार आहे. कुष्ठरोग व क्षयरोग सर्वेक्षण करताना आरोग्य पथक रोगाची लक्षणे असणा-या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचार करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आजाराबाबत जनजागृती करून त्यांच्यातील न्यूनगंड दूर करून कुष्ठरोग, क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. या सर्वेक्षणाचा शुभारंभ शिरूर अनंतपाळ शहरातील समतानगर येथून करण्यात आला. यावेळी उपस्थित नगरातील महिला, पुरुष, तसेच सर्व मान्यवरांनी संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग सर्वेक्षण मोहीम यशस्वी करण्यास सर्वतोपरी मदत करावी असे सांगितले. यावेळी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडीताई व ग्रामस्थ उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या