22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeलातूरशिरुर अनंतपाळ येथे कटाळ्याने घेतला एकाचा प्राण

शिरुर अनंतपाळ येथे कटाळ्याने घेतला एकाचा प्राण

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शहरातील मोकाट जनावरे नागरिकांच्या जीवावर उठले असून पोलिस चौकी शेजारी विश्वनाथ गायकवाड यांना कटळ्याने जोराची धडक दिल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर नगरपंचायतच्या वतीने रविवारी तात्काळ बैठक घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात आला असून या मोकाट जनावरांना गोरक्षण शाळांकडे सुपुर्द करण्यात आले आहे.

शिरूर अनंतपाळ शहरातील देवस्थानास जनावरे सोडण्याची जुनी परंपरा आजतागायत सुरू आहे. या प्रथेतून सोडलेल्या जनावरांची संख्या मोठी झाल्याने त्यांचा वाहतुकीला अडथळा होत असून शेती पिकांचेही मोठे नुकसान होत असल्याने अनेक नागरिकांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाकडे दादही मागितली मात्र यांकडे कोणी लक्ष दिले नाही परिणामी एकाला आपला जीव नाहक गमवावा लागला आहे.

दरम्यान या दुर्घटनेचे गांभीर्य पाहता रविवारी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी श्री अनंतपाळ मंदीर कमेटी,वनविभाग अधिकारी, पशूवैद्यकीय अधिकारी,पोलीस निरिक्षक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विषय सभापती,गटनेते,नगरसेवक, मुख्याधिकारी, नगर अभियंता, माजी पं.स.सभापती आदींच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. सर्वानुमते या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय झाला. या मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी पशुसंवर्धनचे सर्व कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी, नगरपंचायत नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष, नगरसेवक व सर्व नगरपंचायत कर्मचा-यांसह नागरिकांनी मोकाट जनावरांना पकडण्यासाठी परिश्रम घेतले. सदरील बैठकीत मोकाट जनावरांपैकी गाई व कालवडींना पकडून गोरक्षणात
पाठविण्याची मोहिम राबविण्यात आली आहे. याविषयी मुख्याधिका-यांशी संपर्क साधला असता या घटनेची माहिती वरिष्ठ अधिका-यांना कळवून या संदर्भात पुढील बैठकीत निर्णय घेणार असल्याचे सांगितले

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या