18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeलातूरशिवपूर येथे तज्ज्ञांकडून शिलालेखाचे वाचन

शिवपूर येथे तज्ज्ञांकडून शिलालेखाचे वाचन

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील शिवपूर गावातील वाचनाअभावी राहिलेल्या प्राचीन शिलालेखाचे तज्ञाकडून वाचन करण्यात आले असून या शिलालेखात सोमरस व बम्मरस यांनी काही जमीन दान दिली असून ती जमीन जो कोणी हडप करण्याचे मनात चिंतील तो व्यक्ती नि:संतान होईल व तो त्याच्या आयुष्याचे सर्व काही सूत्र आणि सर्व काही गमावून बसेल असे शापवचन हळेकन्नड लिपीमध्ये कोरण्यात आले आहे.

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर हे ऐतिहासिक गाव आहे. येथे गावात प्राचीन पुष्करणी असून तिच्या पश्चिम बाजूस नारायण मंदिर आहे. मंदिरातील शेषशयनी विष्णू मूर्ती प्राचीन असून मंदिर मात्र नवीन बांधलेले आहे. त्याच पुष्करणीच्या पुर्व बाजूस तीन शिळा उभ्या करून ठेवलेल्या आहेत त्यात एक शिलालेख आहे. या शिलालेखाचे उल्लेख लातूर जिल्हा गॅझेट व इतर ठिकाणी आले आहेत मात्र वाचन अद्याप झाले नव्हते. मात्र आता या शिलालेखचे वाचन झाले असून नवीन इतिहास उजेडात आला आहे. इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे यांनी यांवर संशोधन करून महत्त्वपूर्ण माहितीचा उलगडा केला आहे.

शिलालेखच्या वरील बाजूस सूर्य चंद्र यांचे अंकन आहे यावरून हे शासन सूर्य चंद्र असे पर्यंत असेच शाश्वत राहावे असा अर्थ आहे. या शिलालेखावर एकूण सात ओळी असून मजकूर हळे कन्नड लिपीत आहे. शिळेची उंची २२ इंच तर रुंदी १२ इंच आहे. शिलालेखात उल्लेख आल्या प्रमाणे सोमरस व बम्मरस यांनी एका मंदिराला भूदान दान दिले. मात्र कोणत्या देवाला व किती भूदान दिल्याचे समजत नाही. लेखात तिथीचा उल्लेख नसल्याने हा शिलालेख अक्षरवाटिका व वापलेले शब्द यावरून हा शिलालेख १४ व्या ते १५ व्या शतकातील असावा असा अंदाज आहे.

या शिलालेखात शापवचन लिहिलेले असून हे दिलेले दान जो कोणी हडप करण्याचे मनातचिंतील तो व्यक्ती नि:संतान होईल व तो त्याच्या आयुष्याचे सर्व काही सूत्र आणि सर्व काही गमावून बसेल. अशा प्रकारचे वर्णन आले असून शिलालेखावर सर्वांत खाली गाढवाचे शिल्प आहे हे शिल्प एक प्रकारे दान मोडणा-यास शिवी किंवा प्रतिकात्मक रुपात कोरले आहे.

या शिलालेखच्या उपलब्धतेमुळे व वाचनाने शिवपूर गावच्या इतिहासात भर पडली असून तत्कालीन व्यक्ती व समाज जीवन यांवर प्रकाश पडला आहे. या शिलालेखाचे संशोधन कृष्णा गुडदे यांनी केले असून हळेकन्नड लिपी वाचनासाठी डॉ. रविकुमार नवलगुंड यांची, भाषांतरात डॉ. सुजाता शास्त्री यांची मदत झाली तर याकामी शिवपूरचे ग्रंथमित्र संजय सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या