लातूर : प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी सात वाजता शिवरायांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला. पुष्प कुंकुमाने त्यांची पुजा करण्यात आली.
यावेळी हर हर महादेव अशी गर्जना करीत जिजाऊ, शिवराय व शंभू महाराजांचा जयजयकार करण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. हर्षवर्धन राऊत, ऋषिकेश कदम, हंसराज जाधव, अॅड. शिवकुमार जाधव, डी. एस. पाटील, सचिन साळुंके, सचिन डोंगरे, अभिमन्यू जगदाळे, प्रतिक जाधव, प्रताप भोसले, धनंजय शेळके, वैशाली लोंढे, श्वेता लोंढे, विशाल हल्लाळे, शैलेश भोसले, सतिश करंडे, बालाजी जाधव, विजय जाधव, योगेश शिंदे, अनिल जाधव आदिसह अनेकांची उपस्थिती होती.