24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरशेतक-यांच्या बांधावर आणून दिला आमदार निधी

शेतक-यांच्या बांधावर आणून दिला आमदार निधी

एकमत ऑनलाईन

निलंगा : एका सामान्य कुटुंबातील मुलाला तुम्ही आमदार केलात याची जाणीव ठेवून कसलाही भेदभाव न करता संपूर्ण मतदारसंघाचा विकास हाच अजेंडा घेऊन आपले काम सुरू आहे. आमदार निधी मंजूर करुन घेण्यासाठी आमदारांचे दरवाजे झिजवावे लागतात असा अनुभव अनेकांना असताना याला फाटा देत आपण थेट शेतक-याच्या बांधावर आमदार निधी दिल्यामुळेच मतदारसंघात आठशे किलोमीटरचे शेतरस्ते पूर्ण झाले असून मतदारसंघातील शेतकरी समृद्ध व्हावा म्हणूनच मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियान हाती घेतल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

दि.१८ एप्रिल रोजी मनरेगातून ग्रामसमृद्धी या अभियाना निमत्ति ते निलंगा तालुक्यातील सांगवी व जेवरी येथील लोकांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपली दारे सदैव खुले आहेत. आपण जमिनीवरचे आमदार असून सर्व सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी चोवीस तास मतदारसंघात उपलब्ध आहोत. मतदारसंघातील शेतक-याच्या आर्थिक उन्नतीसाठी हे अभियान घेऊन मतदारसंघातील प्रत्येक गाव, तांडा व वस्ती येथील शेतक-यांंशी संवाद साधण्याचा हा प्रयत्न आहे. शेतक-यांना समृद्ध करायचे असेल तर त्यांना वीज, पाणी व शेतरस्ते देणे आवश्यक आहे. हेच उद्दीष्ट घेऊन आपण काम करीत आहोत. मतदारसंघातील प्रत्येक शेतक-यास शेतरस्ता देणे हे आपले उद्दीष्ट असून या अनुषंगाने आपण काम करीत आहे.

शेतक-यानी मनरेगा अंतर्गत योजनेचा लाभ घ्यावा यामध्ये फळबाग लागवडीसाठी १८ प्रकारच्या फळांचा समावेश होतो. शासनाच्या नवीन अध्यादेशात ड्रगन, केळी व द्राक्ष याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. फुलबांगासाठी गुलाब, मोगरा, निशिगंध व सोनचाफा आदी फुलांचा समावेश या योजनेत होतो तर ८ प्रकारचे शेततळे या योजनेत येतात यातील प्रत्येक योजनेसाठी शासनाचे भरीव अनुदान मिळते. या योजनेत फळबाग केल्यानंतर ठिबक सिंंचनासाठी अतिरिक्त अनुदान घेता येईल. जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी नाफेड व वरमी कंपोस्ट खतासाठीही शासन पैसे देते. यामुळे या योजनेचा लाभ शेतक-यांनी घ्यावा, यासाठी हे अभियान हाती घेण्यात आल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे कासारसिरसी मंडळाध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, माजी पंचायत समिती सदस्य बळीराम पाटील, परमेश्वर बिराजदार, प्रशांत येळनुरे,जेवरी सरपंच संजय जेवरीकर, निलंगा तालुका कृषी अधिकारी श्रीनिवास काळे, कृषी मंडळधिकारी शेळके, डोंगरगाव सरपंच कविता गोरे, सतिश सरतापे, नागोराव राठोडे, नागोराव जगताप, एम.डी.सरतापे, यशवंत सरतापे, नागोराव गायकवाड, संग्राम बिराजदार,अर्चना राठोड, पंढरी सरतापे ज्ञानोबा सोमवंशी, विष्णू बोरफळे,उल्हास सरतापे, विश्राम जाधव, सुरेश सरतापे,मनोज पाटील, पवन गायकवाड, खंडू जेवळे, दत्ता सावरे, बाबुराव कुळकर्णी, बुध्दीवंत चावरे, शंकर तारे, राजेंद्र पाटील, लखन क्षिरसागर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या