27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeलातूरशेतक-यांनी राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा

शेतक-यांनी राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्यस्तरीय कृषि महोत्सव १ ते ५ जानेवारी या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे आयोजित करण्याज आला आहे. या कृषि महोत्सवात कृषि प्रदर्शन, कृषि विज्ञान केंद्र, चारही कृषि विद्यापीठांचे स्टॉल, कृषि निगडीत साहित्याचे प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांनी या कृषि महोत्सवाला भेट द्यावी. याठिकाणी मांडण्यात आलेले आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

लातूर जिल्ह्यातील शेतक-यांसाठी ४ जानेवारी २०२३ हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. या दिवशी शेतक-यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले असून राज्यस्तरीय कृषि महोत्सवाची जिल्ह्यात प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दवंडीद्वारे प्रदर्शनाबाबत माहिती देण्यात येणार असून सूचना फलकावर कृषि महोत्सवाची माहिती नमूद करण्यात येणार आहे.

शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेती औजारे उत्पादक कंपनी यांनी त्यांच्या उत्पादनाची माहिती देण्यासाठी उत्पादनाच्या शेती नमुन्यासह त्या ठिकाणी स्टॉलची उभारणी करावी. तसेच शेतक-यांच्या नाविन्यपूर्ण उत्पादनाचे नमुनेही या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या भागातील कृषि कर्मचा-याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या