29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरशेतमाल तारण योजनेला प्रतिसाद

शेतमाल तारण योजनेला प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर बाजार समितीच्या वतीने राबविण्यात येत आसलेल्या शेतमाल तारण योजनेला शेतक-यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आवघ्या दीड महिण्यात ५०७ शेतक-यांनी १९ हजार क्ंिवटल सोयाबीन शेतमाल तारण ठेवला आहे. या शेतक-यांना ५ कोटी ६७ लाख ६६ हजार २७० रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

रब्बी हंगाम तोंडावर शेतक-यांना आर्थिक अडचण भासू नये, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये दि. १८ ऑक्टोबर पासून सोयाबीन शेतमाल तारण योजना राबवण्यात येत आहे. जे शेतकरी सोयाबीन हा शेतमाल तारण ठेवणार आहेत. त्या शेतक-यांना शेतमालावर आधारीत सहा टक्के दराने कर्ज वाटप हे केले जात आहे. तारण कर्ज बाजार भावाच्या ७५ टक्के रकमेवर सहा महिण्यासाठी देण्यात येते. या योजनेमुळे शेतक-यांना आपला शेतिमाल बाजार पेठेत जास्तीत जास्त भाव आल्यास विक्री करता येतो. त्यामुळे शेतक-यांना आर्थिक फायदा होतो.

लातूर बाजार समितीच्या गोडावून मध्ये ४२४ शेतक-यांनी १६ हजार २१४ क्विंटल सोयाबीन हा शेतमाल तारण ठेवला असून त्यांना ४ कोटी ८६ लाख ४२ हजार ६०० रूपयांचे कर्ज देण्यात आले आहे. तसेच लातूर बाजार समितीची उपबाजार समिती मुरूड येथे ८३ शेतक-यांनी २ हजार ७०७ क्ंिवटल शेतमाल तारण ठेवून ८१ लाख २३ हजार ६०० रूपयांचे शेतक-यांनी कर्ज घेतले आहे. तर गेल्यावर्षी २५२ शेतक-यांनी १० हजार ५१६ क्विंटल सोयाबीन तारण ठेवले होते. या शेतक-यांना ३ कोटी १५ लाख ४८ हजार ३०० रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. मात्र यावर्षी सोयाबीनचे वाढते दर पाहता शेतमाल तारण योजनेकडे शेतक-यांचा कल वाढलेला दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या