22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरशेतक-यांवर तिहेरी संकट

शेतक-यांवर तिहेरी संकट

एकमत ऑनलाईन

चाकूर : प्रतिनिधी
चाकूर तालुक्यातील बहुतांश गाव शिवारातील सोयाबीनचे पिके पावसा अभावी सुकु लागली आहेत. यंदा जवळपास पंच्याहत्तर टक्के सोयाबीनचे क्षेत्र आहे. नगदी पीक म्हणून यावर शेतक-यांची मोठी भिस्त आहे. मात्र पेरणीनंतर सततचा पाऊस, गोगलगायीचा प्रादुर्भाव, येलो व्हायरसचे संकट आणि आता पावसाच्या अचानक एक्झिटमुळे सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे. आता हे पीक दुपार धरून सुकू लागली आहेत.त्यात शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरीचिंताग्रस्त झाला आहे. यामुळे शेतकरी आता तिहेरी संकटात सापडला आहे.विशेषत: घरणी, दापखेळ, मोहदळ, जानवळ, झरी या गाव शिवारातील हलक्या जमिनी वरील सोयाबीनचे पीक संकटात सापडले आहे.

आता पोळा सण साजरा करून शेती कसण्यासाठी बैलाची पूजा करून शेतकरी अस्मानी संकटामुळे तसेच सुलतानी संकटाशी सामना करीत जेरीस आलेला आहे. सोयाबीनच्या उत्पादनावर शेतक-यांचे वर्ष भराचे बजेट अवलंबून असते. मात्र अचानक पावसाच्या एक्झिटमुळे सोयाबीनचे पीक संकटात सापडले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या