29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरशॉर्टसर्किटने ७० एकरवरील २५ शेतक-यांचा ऊस खाक

शॉर्टसर्किटने ७० एकरवरील २५ शेतक-यांचा ऊस खाक

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील मांजरा पट्टयातील तांदूळजा येथील ऊसाला शॉट सर्किटने आग लागून २५ शेतक-यांचा ७० एक्करावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना बुधवारी दि. २२ डिसेंबर रोजी घडली. या आगीच्या तांडवामुळे शेतक-यांचे लाखो रूपंयाचे नुकसान झाले आहे.

तांदूळजा परिसरात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांनी मोठया प्रमाणात ऊसाची लागवड केली होती. ऊसाला उन्हाळयात मांजरा धरणातून पाणी सोडल्याने ऊसाचे पिकही जोमात आले होते. लवकरच ऊसांची तोड कारखान्यांकडून येणार होती. अशा वेळीच बुधवारी विद्यूत तारांचे घर्षन होऊन दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचा अंदाज शेतक-यामधून वर्तवन्यात येत आहे. या लागलेल्या आगीत जवळपास २५ शेतक-यांचा ७० एक्कवरील ऊस जळून खाक झाला आहे. नागरीकांनी ऊसाला लागलेली आग विझवण्यासाठी विविध माध्यमाचा वापर केला. मात्र लाखो रूपयांचा ऊस आगीत जळून खाक झाला.

या आगीत ऊसाच्या बरोबरच फळांची झाडे, पशुधनासाठी जमा केलेला कडबा, ऊसाचे वाडे जळून खाक झाले आहे. हरिराम गायकवाड, नानासाहेब गायकवाड, यश गायकवाड, चंद्रकांत देवणे, बबर गायकवाड, कांताबाई जाधव, ज्ञानोबा कदम, रावण देवणे, पांडूरंग आणेराव, शाम जाधव, शाम आणेराव, विठ्ठल आणेराव, रावसाहेब गायकवाड, राजेसाहेब गायकवाड, गोविंद गायकवाड, विष्णू भिसे, अच्यूत भिसे, हणमंत गायकवाड, छबूबाई गायकवाड मधूकर शिंदे, नवनाथ गायकवाड, सुनिल गायकवाड, सुर्यकांत आणेराव आदी शेतक-यांचा ऊस जळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या