22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeलातूरशॉर्टसर्किटमुळे २ एकर ऊस जळून खाक

शॉर्टसर्किटमुळे २ एकर ऊस जळून खाक

एकमत ऑनलाईन

जवळा (बु) : लातूर तालुक्यातील जवळा (बु) येथील शेतकरी शामराव माणिकराव शास्त्री यांचा कासार जवळा शिवारातील गट नं .१६८ मधील दोन एक्कर ऊस सोमवारी दि ६ डिसेंबर २०२१ शॉर्टसर्कीटमुळे जळुन खाक झाल्यांची घटना घडली आहे. यात दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.

शास्त्री यांच्या शेतामध्ये डी. पी. असल्यांने मेन लाईट व सब लाईट असे दोन्ही विद्युत प्रवाह शेतामध्ये आहेत. उघड्या डी. पी. व लोंबणा-या तारा यांमुळे प्रती वर्षी असा ऊस जळण्यांचा प्रकार शास्त्री यांच्या शेतात होतो.या बाबत वारंवार महावितरण च्या कर्मचा-याना व अधिका-यांना सांगूनही ते दखल घेत नसल्यांचे शेतकरी सांगत आहेत. या प्रसंगी वेळीच सावधानता राखत गावातील व परिसरांतील शेतक-यांनी आग विझवली. अन्यथा साठ ते सत्तर एक्कर ऊस व कांही घरे ही आगी मुळे जळाली असती. याबाबतची माहिती व तक्रार देण्यांसाठी संबधित शेतकरी गाधवड सबस्टेशनच्या अधिका-यांकडे तक्रार देण्यांसाठी गेले असता संबंधित अधिका-यांनी तक्रार गांभीर्याने घेत नाहीत. या बाबत शेतक-यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित शेतकरी झालेल्या नुकसानींची भरपाईची मागणी करीत असून लोंबकळलेल्या तारा, वाकलेले पोल दुरुस्त करण्यांची मागणी केली जात आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या