29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeलातूरश्री ज्ञान सरस्वती प्रतिष्ठानतर्फे आजपासून संगीत समारोह

श्री ज्ञान सरस्वती प्रतिष्ठानतर्फे आजपासून संगीत समारोह

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
येथील श्री ज्ञान सरस्वती प्रतिष्ठानच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दि. ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर यादरम्यान दररोज सायंकाळी ५ वाजता श्री ज्ञान सरस्वती मंदिर संस्थान सभागृह संगीत नगरी, बार्शी रोड, लातूर या ठिकाणी भव्य संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीत समारोहाचे उद्घाटन रुईभर येथील दत्त संस्थानचे प्रमुख आप्पाबाबा महाराज रुईभरकर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे चॅरिटी कमिशनर बी. डी. कुलकर्णी, अ‍ॅड. सांबाप्पा गिरवलकर, तुकाराम पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, मुख्य अभियंता सुंदर लटपटे हे उपस्थित राहणार आहेत.

संगीत महोत्सवात पुणे येथील सुप्रसिद्ध गायिका स्वराली जोशी, सुप्रसिद्ध गायक संकेत दरकदार (शिर्डी), सुरमणी पंडित बाबुराव बोरगावकर, तालमणी डॉ. राम बोरगावकर, औरंगाबाद येथील प्रा. अनिल डोळे आणि त्यांचा शिष्यवृंद, सोलापूर येथील गायिका संध्या जोशी, तबलावादक अमरीश शीलवंत (बिदर), संगमनेर येथील गायक तुपे, सुप्रसिद्ध पखवाज वादक पं. प्रभाकर वाघचौरे (पुणे), गायक शिवरुद्र स्वामी, प्रा. लक्ष्मण श्रीमंगले, प्रा. विजयकुमार धायगुडे, गायक वेदांग धाराशिवे, विख्यात गायिका सरस्वती बोरगावकर-शीलवंत, मधुवंती बोरगावकर-देशमुख (पुणे), प्रा. गणेश बोरगावकर, प्रा. विश्वनाथ स्वामी यांचेसह महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक उदयोन्मुख दिग्गज कलावंत या संगीत समारोहात सहभागी होवून आपली संगीत सेवा रुजू करणार आहेत. जास्तीत जास्त रसिक श्रोत्यांनी या संगीत समारोहाप्रसंगी उपस्थित राहून या संगीत मेजवानीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजक संस्थांनप्रमुख सुरमणी पं. बाबुराव बोरगावकर आणि तालमणी डॉ. राम बोरगावकर यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या