28.3 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeलातूरसंत ज्ञानेश्वर विद्यालय,घोणशी येथील जि.प.शाळा प्रथम

संत ज्ञानेश्वर विद्यालय,घोणशी येथील जि.प.शाळा प्रथम

एकमत ऑनलाईन

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने दि ९ व १० जानेवारी या दोन दिवशीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन पाटोदा बुद्रुक येथील शकुंतला माता आश्रम शाळेमध्ये करण्यात आले होते. या प्रदर्शनात तालुक्यातील ३० शाळांनी सहभाग घेतला होता. शेवटच्या दिवशी या ३० शाळांमधून उत्कृष्ट प्रयोग करण्यात आले असून माध्यमिक गटातून सोनवळा येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय तालुक्यातून प्रथम आले आहे तर प्राथमिक गटातून जिल्हा परिषद शाळा घोणशीचा प्रयोग प्रथम आला आहे.

सोनवळा शाळेतील विद्यार्थी मेघराज कोरे यांनी माहिती संप्रेषण या विषयावर प्रयोग सादर केला तर घोणशी येथील शाळेतील अंजली माधव आंब्रे या विद्यार्थिनीने आरोग्य व स्वच्छता या विषयावर प्रयोग सादर केला तर शिक्षकांचे प्रयोग या प्रयोगशाळेत प्रथम काढण्यात आले असून प्राथमिक गटातून प्रेमदास वाल्मीक राठोड जि प प्रशाला माळहीप्परगा तर माध्यमिक गटातून माध्यमिक आश्रम शाळा चिंचोली येथील मुर्के एसडी या शिक्षकांचा प्रयोग प्रथम आला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी जयसिंह जगताप हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ .बी. टी. लहाने, लातूर डाएटचे अधीव्याख्याता डॉ. योगेश सुरवसे, माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अनंत देशमुख, केंद्रप्रमुख नारायण तिगोटे, माधव देमगुंडे, टाकळे पी. आर यांची प्रमुख उपस्थिती होती. या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटातून प्राथमिक शाळा उमरगा रितू येथील समर्थ माणिकराव कुलकर्णी यांचा वाहतूक व नवोपक्रम हा प्रयोग द्वितीय आला तर आरती जय जय राम विभुते शकुंतला माता प्राथमिक आश्रम शाळा पाटोदा बुद्रुक येथील शेतीपूरक व्यवसाय हा प्रयोग तृतीय आला तर विकास विद्यालय अतनूर येथील विद्यार्थी शुभम जाधव यास उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

माध्यमिक गटातून गुरुदत्त विद्यालय जळकोट येथील श्रद्धा बालाजी ज्योती हिच्या गणितीय साहित्याला द्वितीय बक्षीस देण्यात आले. माध्यमिक आश्रम शाळा चिंचोली येथील अजय उत्तम तोगरे यांच्या पर्यावरण या प्रयोगास तृतीय पारितोषिक देण्यात आले. संत नामदेव विद्यालय धामणगाव येथील विद्यार्थिनी निकिता संभाजी आगलावे या रेन वॉटर हार्वेस्टिंग या प्रयोगास उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. माध्यमिक गटातून संत नामदेव विद्यालय धामणगाव येथील किडीले व्ही. एन. यांचा प्रयोग द्वितीय आला. प्राथमिक गटातून केंद्रीय प्रा शाळा गुणशी येथील संगीता गंगाधर चिट्टे यांचा प्रयोग द्वितीय आला.

परीक्षक म्हणून माधव वाघमारे, बिचकुंदे, किडीले यांनी काम पाहिले. या कार्यक्रमांमध्ये डॉ. सुरवसे योगेश, लहाने, जगताप यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन सास्तूरकर यांनी केले तर आभार आदावळे यांनी मानले. या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी जाधव ए. एम., कंदाकुरे एस. बी., केंद्रे डी. एस., कांबळे सी. एन., अखंड एस. आर., वाघमारे एम. के., सोनटक्के एस. एच., अदावळे व्ही. एस., श्रीमती शेख बी. एस., तिडके एस. बी. यांनी परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या