18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeलातूरसंभाव्य अपघात टाळण्यासाठी कारखान्याचे आणखी एक पाऊल

संभाव्य अपघात टाळण्यासाठी कारखान्याचे आणखी एक पाऊल

एकमत ऑनलाईन

विलासनगर : प्रतिनिधी
येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने ऊस वाहतूक करणा-या वाहनांना रिफलेक्टर बसवले आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी कारखान्याने राज्य महामार्ग पोलीस केंद्राच्या सहकार्याने आणखी एक पाऊल पुढे टाकला आहे.

राज्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सध्या सुरू आहे. साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमााणात उसाची वाहतूक ट्रक, ट्रॅक्टर्स, बैलगाड्या आदी वाहनांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे सतत रस्त्यावर वाहनांची होत असलेली गर्दी विचारात घेता, ऊस वाहतुकीच्या लोडींंग वाहनांचे संभाव्य अपघात टाळण्यासाठी राज्य महामार्ग पोलिस केंद्र लातूरच्या सहकार्याने विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यान ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर्स व बैलगाड्यांना रिफलेक्टर व रेडीयम दि. २९ नोव्हेंबर रोजी कारखाना कार्यस्थळावर स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करुन बसविण्यात आले आहेत. त्याच बरोबर संबंधीत वाहनांचे चालक, क्लिनर, बैलगाडीचे चालक यांना संभाव्य अपघात टाळण्याकरिता रस्ता सुरक्षीततेच्या जॅकेटचेही वितरण करण्यात आले.

ऊस वाहतुकीची वाहने व बैलगाड्यांना रिफलेक्टर व वाहन चालक, क्लिनर व बैलगाडीवानांना रस्ता सुरक्षिततेचे जॅकेट दिल्याने सदर वाहने रस्त्यावरुन ये-जा करत असताना संभाव्य अपघात टाळले जाणार आहेत. या कार्यक्रमास राज्य महामार्ग पोलीस केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक विनायक राठोड यांनी रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वाहन चालक, क्लिनर व बैलगाडीवानांना उपयुक्त सूचना व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक व ऊस विकास, ऊस पुरवठा समितीचे अध्यक्ष अशोकराव काळे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, राज्य महामार्ग पोलिस विभागाचे पोलिस कर्मचारी, वाहन मालक, चालक, क्लिनर, बैल्ांगाडीवान, कारखाना अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या