26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूरसंविधान चौक ते एक नंबर चौक दुभाजकाची स्वच्छता

संविधान चौक ते एक नंबर चौक दुभाजकाची स्वच्छता

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. शहरात वृक्ष लागवड करुन वृक्षांचे संवर्धन करणे, चौकांचे सुशोभीकरण करुन रस्ता दुभाजकांत शोभिवंत झाडे लावणे आदी कामे केली जात आहेत. या कामात ग्रीन लातूर वृक्ष टीमसह विविध सामाजिक संस्थाही सहभागी झाल्या आहेत. त्यात ग्रीन लातूर वृक्ष टीमचे कार्य उल्लेखनिय आहे. मंगळवारी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने संविधान चौक ते एक नंबर चौकापर्यंतच्या रस्ता दुभाजकाची स्वच्छता करण्यात आली आहे.

लातूर शहरातील हरित क्षेत्र खुप कमी होते. त्याचा परिणाम हवामान, पर्यावरणावर होत होता. ही बाब लक्षात घेता महानगरपालिकेने शहरात वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली आणि विविध संस्थांच्या सहकार्यातून शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाला. या कामात विलासराव देशमूख फाऊंडेंशनचेही मोठे योगदान आहे. आज शहरातील प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. चार-पाच वर्षांनंतर लातूर शहराच्या हरित क्षेत्रात ब-यापैकी वाढ झालेली दिसणार आहे. शहर हरित करण्याचा सर्वांचाच प्रयत्न कौतूकास्पद आहे. परंतू काहीजण रस्ता दुभाजकाचा वापर कचरा कुंडीसारखा करीत असल्यामुळे दुभाजकातील शोभीवंत झाडे मरत आहेत. कचरा दुभाजकात टाकण्याचे टाळणे आवश्यक आहे. शिवाय आपापल्या दुकानासमोरील झाड जगविण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी मंगळवारी संविधान चौक ते एक नंबर चौका पर्यत दुभाजक स्वच्छता मोहीम सुरु केली. दुभाजकात वाढलेले खुरटे गवत, दुभाजकातील केरकचरा, भंगार साहित्य, हॉटेल व्यवसायिकांनी टाकलेले चहाचे कप, खरकटे अन्न दुभाजकाच्या बाहेर काढून एकत्रित केले. अंदाजे २ ट्रॅक्टर साहित्य गवत, कचरा जमा करण्यात आला. आपलं शहर स्वच्छ ठेवा अशा घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. या अविरत कार्याच्या ९०३ व्या दिवसाच्या उपक्रमात डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, पद्माकर बागल, सुलेखा कारेपुरकर, नितीन पांचाळ, बाळासाहेब बावणे, ख्वॉजा पठाण, पूजा पाटील, विदुला राजमाने, भगवान जाभाडे, विजय मोहिते, तेजस मुंडे, नितीन कामखेडकर यांनी प्रयत्न केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या