25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरसम्यक दानावर विद्रोही साहित्य संमेलन आजपासून

सम्यक दानावर विद्रोही साहित्य संमेलन आजपासून

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने उदगीर येथे दोन दिवसीय १६ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाला मूठभर धानय आणि एक रुपया द्या, अशी हाक विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे किशोर ढमाले यांनी दिली. जनतेच्या क्रांतीकारी साहित्य-संस्कृतीच्या जागरात एक रुपयांचे सम्यक दान करुन सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

उदगीर येथील जिल्हा परिषदेच्या मैदानात दि. २३ व २४ एप्रिल रोजी विद्रोही साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनामध्ये समतावादी, सत्यशोधकी विचारांचा जागर होणार आहे. समतावादी, सत्यशोधकी विचाराचा जागर करत कार्यकर्ते गाणे गात मुठभर धान्य अन् एक रुपया दान संकलन करण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. वाडी, तांडयावर विद्रोहाचा जागर या निमित्ताने आपण मांडत आहोत, असे सांगत किशोर ढमाले म्हणाले की, आपल्या परिने आर्थिक व धान्यरुपी, वस्तुरुपी मदत करुन सहकार्य करा. देणा-याला अहंकार वाटणार नाही आणि घेणा-याला कमीपणा वाटणार नाही, असे सम्यक दान करा आणि जनतेच्या साहित्य-संस्कृतीच्या जागरात सहभागी व्हा.

बहुविविधतेचा सन्मान, बहुभाषिकतेचा आदर, संविधानाचे समर्थन आणि सनातनवादादला विरोध ही या संमेलनाची मुख्य सुत्रे आहेत. उदयगिरी महाराजांच्या नावाने संबोधल्या जाणा-या उदगीर शहरात हे संमेलन होत आहे. कन्नड, दख्खनी, तेलगु, उर्दु या भाषा भगिनीच्या संगमानवर असणा-या उदगीर शहरात विद्रोहाचा जागर घातला जात आहे. उदगीर येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे.

सरकारी तिजोरीवर डल्ला मारुन विद्रोही साहित्य संमेलने भरवली जात नाहीत, तर जनतेच्या निधीतून, मदतीतून भरवली जातात. थाटात भोजनावळी उठविणे हे आपल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे काम नाही तर, समतावादी साहित्य व मुल्य संस्कृतीचा जागर घालणे आपले उद्दिष्ट आह. विचारांची मेजवानी घेण्यासाठी या साहित्य संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन किशोर ढमाले यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या