20.1 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeलातूरसरपंच गटाचा एक सदस्य फुटला

सरपंच गटाचा एक सदस्य फुटला

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : शकील देशमुख
हिसामाबाद ग्रामपंचायतीच्या झालेल्या उपसरपंच निवडणुकीत सरपंच गटाचा एक सदस्य फुटल्याने विरोधी गटाला उपसरपंचपदाची लॉटरी लागली आहे. सरपंचाच्या निर्णायक मतांसह पुर्ण बहुमत असताना देखील जाधव गटाचा एक सदस्याने फुटल्याने उपसरपंचपदाची माळ फारूख जिलानी पटेल यांच्या गळयात पडली. एक सदस्य फुटल्यानेच हे शक्य झाले असून याची परिसरात जोरदार चर्चा झाली.

अकरा सदस्य संख्या असलेल्या हिसामाबाद ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतुन सौ.नंदिनी आनंद जाधव या निवडून आल्या तसेच त्यांचे पाच तर विरोधी गटाचे सहा सदस्य निवडून आले. यात सरपंचाच्या निर्णायक मतामुळे त्यांचा गटाचा उपसरपंच होणार हे निश्चित मानले जात होते. मात्र प्रत्यक्ष निवडी दिवशी विरोधी गटाचा एक सदस्य अनुपस्थित राहिला तर सरपंच गटाचा एक सदस्य फुटल्याने बहुमत असतानाही जाधव गटाला उपसरपंचपद मिळवता आले नाही. दरम्यान नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून सौ.नंदिनी आनंद जाधव या सरपंच म्हणून मोठया मताधिक्याने निवडून आल्या. त्यांच्या गटाचे फक्त पाच सदस्य व सरपंच यांच्या दोन मतांसह सात संख्याबळ होते. मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी गुप्त पध्दतीने मतदान पार पडले. सरपंच गटाकडून अनंत अंबादास जाधव तर विरोधी गटातून फारूख जिलानी सय्यद यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केले. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतमोजणीत अनंत अंबादास जाधव यांना पाच मते पडली.

फारूख जिलानी सय्यद यांना सहा मते पडली. यात सरपंच गटाच्या एका सदस्याने विरोधी गटाला मत दिल्याने जाधव गटाला धक्का बसला तर एक सदस्य फुटल्याने सरपंच नंदिनी जाधव यांना निर्णायक मत देता आले नाही.
निवडणूक निरिक्षक म्हणून विस्तार अधिकारी दिनकर व्होट्टे यांनी काम पाहिले, तर ग्रामविकास अधिकारी जी. पी.कसबे यांनी त्यांना साहाय्य केले. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाके फोडत आनंद व्यक्त केला.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या