लातूर : प्रतिनिधी
सरस्वती विद्यालय खाडगाव प्रकाश नगर लातूर विद्यालयातून एस.एस.सी.बोर्ड परीक्षेस ६०३ विद्यार्थी परीक्षेस प्रवीष्ठ झाले होत. त्यापैकी शिंदे तेजस तानाजी १०० टक्के गुण घेऊन विद्यालयातून सर्वप्रथम आला आहे. माळी ऋषिकेश गोपाळ ९९.८ टक्के गुण घेऊन द्वितीय, तर शेंद्रे प्रणव सुरेश व ससाणे नागसेन यशवंत ९९ टक्के गुण घेऊन तृतीय आले आहेत. विशेष प्राविण्यासह ३६६ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १६९ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ४७ विद्यार्थी व तृतीय श्रेणीत ११ विद्यार्थी, तर एकूण ५९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे ११५ विद्यार्थी आहेत शाळेचा एकूण निकाल ९८.३४ टक्के लागला आहे.
शाळेच्या या उज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बी. एस. नाडे, उपाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, सचिव अॅड. एल. ई. भागवत, शालेय समिती अध्यक्ष सी. के. साळुंके, कोषाध्यक्ष डॉ. आर. एन. लटूरिया, संचालक एस. व्ही. गायकवाड, डी. बी. माने, एस. एस. चपटे, एस. जी. पाटील, पी. पी. राठी, मुख्याध्यापक के. एच. शेळके, उपमुख्याध्यापक डी. आर.कुलकर्णी, पर्यवेक्षक आर. जी. गायकवाड, एच. एस. गवळी व संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.