22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeलातूरसहकारी पतसंस्था अडचणीत येणार नाहीत याची काळजी घेणे ग्रामीण भागाच्या हिताचे

सहकारी पतसंस्था अडचणीत येणार नाहीत याची काळजी घेणे ग्रामीण भागाच्या हिताचे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
देशाच्या विकासात सहकार क्षेत्रातील विविध संस्थाचा मोलाचा वाटा असून या पतसंस्था सक्षमपणे चालत राहिल्यास निश्चितच देशाचा विकास साधेल, असे सांगून सहकारी संस्था अडचणीत येणार नाहीत. याची काळजी प्रत्येकाने घेण्याची गरज असून ग्रामीण भागाच्या हिताचे ते ठरेल प्रतिपादन राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले आहे.

सहकार क्षेत्रातील विविध बदलांचा व नविन आव्हानांच्या अनुषंगाने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था लातूर विभाग व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर विभागातील नागरी/ग्रामीण बिगरशेती व कर्मचारी सहकारी पतसंस्था अधिकारी व कर्मचारी यांची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करतेवेळी ते बोलत होते. मार्केट यार्डातील स्व.दगडोजीराव देशमुख सभागृहात दि. १७ जुलै रोजी सदरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे व प्रमुख पाहुणे म्हणून अपर निंबंधक प्रशासन सहकारी संस्था महाराष्ट्र शैलेश कोतमीरे, बीड जिल्ह्याचे डीडीआर समृत जाधव ,लातूर जिल्हा बँकेचे संचालक अशोक गोविंदपुरकर, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक एच. जे. जाधव आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना सहकार आयुक्त अनिल कवडे म्हणाले की, राष्ट्रीयकृत बँकां मोठ्या प्रमाणात गावा-गावात सेवा देत असताना, सहकारी पतसंस्था सदस्य व पदाधिका-यांनीदेखील आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आपल्यातील उणीवा व जमेची बाजू विचारात घेऊन त्या दृष्टीने वाटचाल करायला हवी. सहकार क्षेत्राची स्थापना केली जात असताना जे तत्व डोळ्यासमोर ठेवले गेले होते. ते तत्व आपण सर्वांनी प्रत्यक्षात कृतीत उरवले पाहीजेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सदरील कार्यशाळेस सहकारी पतसंस्था अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो: १२

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या