27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरसहकार क्षेत्रात जिल्हा बँकेचे कार्य दीपस्तंभासारखे

सहकार क्षेत्रात जिल्हा बँकेचे कार्य दीपस्तंभासारखे

एकमत ऑनलाईन

चाकूर : प्रतिनिधी
सहकार क्षेत्रात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्य हे दीपस्तंभासारखे असुन महाराष्ट्र राज्यात पहिल्या टॉप टेन बँकेत आणि पहिल्या टॉप फाईव्ह बँकेत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असुन आगामी काळात आपली बँक टॉप र्थी मध्ये कशी येईल यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांनी केले आहे.

चाकूर येथील जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक एन. आर. पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन अँड. प्रमोद जाधव, संचालक अशोक गोविंदपुरकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव बुदरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर आमदार धीरज देशमुख यांच्या शुभहस्ते फीत कापून नुतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक, विविध कर्मचारी पतसंस्था यांना पतपुरवठा करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करीत आहे. तसेच शैक्षणिक कर्ज, शुभमंगल योजना, पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्जाची योजना अशा प्रकारच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्या माध्यमातून या जिल्ह्यातील सर्व घटकांची आर्थिक उन्नती होईल असा विश्वास व्यक्त करीत आमदार देशमुख म्हणाले की, आमचे आदर्श या नगरीचे सुपुत्र माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, लोकनेते विलासराव देशमुख हे असुन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या बँकेची वाटचाल दैदिप्यमान अशीच असल्याचे सांगितले.

यावेळी गोविंदपुरकर म्हणाले की, चेअरमन धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली, तसेच सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वाटचाल यशस्वीपणे चालू असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोपात पाटील यांनी लातुर जिल्हा मध्यवर्ती बँक ही शिक्षक, उद्योजक, व्यावसायिक, शेतक-यांना कल्पवृक्षा सारखी वाटते. ते प्रगतीचे स्वप्न पाहतात, बँक त्या स्वप्नाला प्रत्यक्षात पुर्ण करते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद इगे यांनी केले. सुत्रसंचलन प्रमोद हुडगे आणि शादुल शेख यांनी केले. तर उपस्थितांचे आभार संचालक बालाजी वेळापुरे यांनी मानले. या प्रसंगी शिक्षक सहकारी पतसंस्थेचे शिक्षक सभासद उपस्थित होते. या प्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या