लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मंत्री, मांजरा परिवारातील साखर कारखान्याचे मार्गदर्शक तथा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १८ एप्रिल रोजी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखाना येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हातून समाजाची, अशीच सेवा घडत रहावी व त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशा मनोकामना व्यक्त करण्यात आल्या. यानिमित्त शहरा व जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ऊस तोडणी वाहतूक बैलगाडीधारकासाठी पिण्याचे पाण्याची कॅनव्हास पिशवी वाटप करण्यात आली, कामगारांसाठी इंडस्ट्रियल हेल्मेट वाटप करण्यात आले, वन्यप्राणी पाणवटे सुरु करण्यात आले, कामगार व कामगारांच्या मुलांसाठी अभ्यासिका सुरु केली गेली. तसेच बॅडमिंटन किट वाटप करुन, कारखान्याचे लातूर ऑफिससमोर पाणपोई व्यवस्था करण्यात आली. तसेच रांगोळी स्पर्धा देखील यावेळी घेण्यात आली व त्यांना प्रशस्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. यासोबतच मातोश्री वृद्धाश्रम येथे भोजन व्यवस्था केली गेली आहे. अशा विविध सामाजिक उपक्रमाने सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, संचालक अशोक काळे, तात्यासाहेब देशमुख, वसंत उपाडे, बंकट कदम, सदाशिव कदम, अनिल दरकसे, सूर्यकांत पाटील, नीळकंठ बचाटे, सचिन शिंदे, धनराज दाताळ, ज्ञानेश्वर पवार, कैलास पाटील, नवनाथ काळे, शेरखॉन पठाण, विशाल पाटील, विलास चामले, शंकर बोळगे, बाबुराव जाधव, महेंदनाथ भादेकर, ज्ञानेश्वर भिसे, श्रीनिवास देशमुख, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांच्यासह खाते प्रमुख, अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.