24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरसहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची औसा शहर, तालुका कॉग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांनी घेतली...

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची औसा शहर, तालुका कॉग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांनी घेतली भेट

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची सोमवारी आशियाना निवासस्थानी औसा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आझादी गौरव पदयात्रा निमित्ताने कॉग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या नेतृत्वाखाली औसा तालुका व शहरातील सर्व कॉग्रेस पदधिकारी व कार्यकर्त यांनी भेट घेतली.

या वेळी जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, बाबासाहेब गायकवाड, दत्तोपंत सुर्यवंशी, शकीलभाई शेख, प्रा. सुधिर पोतदार खुंदमिर मुल्ला, इंजी अजहर हाशमी, जयराज कसबे, भागवत म्हत्रे, हाजी शेख, दिपक कांबळे, मुस्तफा अलुरे उपस्थीत होते. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जिल्हा काँग्रेसने काढलेल्या पदयात्राने काँग्रेसचा विचार विकास लोकांपर्यंत पोहोचवन्यासाठी मोठी मदत झाली. गेली ४० वर्ष काँग्रेसने सक्षमपणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात लोकोपयोगी कामे केली. तो लोकांपर्यंत संदेश गेला आहे. आगामी काळात आपण सर्वांना सोबत घेऊन लोकांची विकासाची दृष्टी ठेवून कार्य करू या असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या