लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या तज्ञ संचालकपदी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आशियाना बंगल्यावर मांजरा साखर परिवारातील साखर कारखाने, विविध संस्था पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. राज्यातील सहकारी साखर कारखान्याची शिखर संस्था असलेल्या राज्य साखर संघावर निवड झाल्याने अनेक मान्यवरांनी मोबाईल, फोनद्वारें सोशल मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातून बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, जालना सांगली, धाराशिव येथून दिलीपराव देशमुख यांना शुभेच्छाचा वर्षाव सोशल मीडिया नेटवर्क मध्ये होत आहे.
आशियाना बंगल्यावर मांजरा साखर कारखाना, रेणा साखर, मारुती महाराज साखर कारखाना यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे संचालक यशवंतराव पाटील, रेणाचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे, संचालक प्रवीण पाटील, डॉ. हरिदास, माटेकर, स्रेहल देशमुख, पाटील, देशमुख, शिखंडी हर्वाडीकर, राम माने, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, संचालक महेंद्र भादेकर, ज्ञानेश्वर भिसे सचिन दाताळ, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, उपाध्यक्ष शाम भोसले संचालक सचिन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अँड. श्रीपतराव काकडे बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, संस्थाचालक संघटनेचे रामदास पवार, सतीश पाटील, दयानंद बिडवे, लक्ष्मण पाटील, आदी मान्यवर तसेच काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
राज्यभरातून अभिनंदन शुभेच्छा संदेश
माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या तज्ञ संचालकपदी निवड झाल्याने राज्यभरातून अनेक लोकप्रतिनिधींनी फोन, सोशल मीडिया, ट्विट व्हॉट्स अॅपच्या माध्यमातुन अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. त्यात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, माजी मंत्री आमदार राजेश टोपे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार धीरज विलासराव विलासराव देशमुख, आमदार बाबासाहेब पाटील, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार प्रणिती शिंदे, प्रतीक पाटील आदी मान्यवरांचा समावेश आहे.