26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूरसहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा सत्कार

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा सत्कार

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील सहकार पॅनलने एक हाती विजय मिळवल्याबद्दल सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा धर्मवीर औदूंबर पाटील बट्टेवार बहुउद्देशिय सेवा भावी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

राज्यात नावलौकीक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलचे १९ पैकी १९ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय झाले आहेत. या निवडणुकीत विरोधी पॅनलचा धुव्वा उडवित सहकार पॅनलने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. त्याबद्दल सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा धर्मवीर औदूंबर पाटील बट्टेवार बहुउद्देशिय सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष अविनाश बट्टेवार यांनी विकासरत्न विलासराव देशमुख यांचे आकर्षक छयाचित्र देऊन सत्कार केला. या वेळी लातूर ग्रामीण माजी आमदार त्रिंबक भिसे, कालीदास खाडप, सुपर्ण जगताप, लक्ष्मण मोरे, प्रविण सावंत आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या