18.6 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeलातूरसाडेचार तोळे दागिण्यांसह रोख रक्कम लंपास

साडेचार तोळे दागिण्यांसह रोख रक्कम लंपास

एकमत ऑनलाईन

किल्लारी: वार्ताहर
रविवारी दि. २२ ते सोमवारी दि. २३ च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या कुलुपबंद घराचे बाहेरील दाराचे व आतील खोलीचे कूलूप तोडून कपाट तोडून साडेचार तोळे सोने व रोख रक्कम असा एक लाख ८२ हजार पाचशे रुपयांचामुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. किल्लारीत ‘पुन्हा चोर मचाये चोर’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात घरपोडीचे सत्र सुरू असून आठ दिवसापूर्वी एकाची तीन तोळे सोने तर एकाचे ५६ कट्टे सोयाबीन लंपास केल्याची घटना चर्चेत असतानाच ही घटना घडली आहे. घरमालक हे तीन दिवसांपूर्वी पुणे येथे गेले होते.

याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कुलूप बंद घरावर डल्ला मारल्याचे दिसून आले आहे. चोर चोरी करण्यासाठी सर्वात आधी कपाटाकडे जातात. याची माहिती असल्याकारणाने घरमालकांनी मौल्यवान वस्तू इतरत्र ठेवल्या होत्या. मात्र चोरांनी एक पाऊल पुढे जाऊन घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत कपाट ही तोडले व घरातील सर्व भांड्यांचा शोधा घेऊन सोन्याचे एक लाकेट, तीन आंगठ्या, एक जोड झुमके असे एकूण साडेचार तोळे सोन्याचे दागिने व सत्तर हजार रुपये रोख रक्कम असे एकूण एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी दि. २४ शिवमूर्ती राम वाळके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजपूत हे करीत आहेत. चो-यांचे सत्र कधी थांबणार असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या