25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरसायकलस्वार राजे यांचा सत्कार

सायकलस्वार राजे यांचा सत्कार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
पर्यावरणपूरक लातूर – पंढरपूर सायकल प्रवास लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापिका सौ.ज्योती राजे यांनी केला. या पर्यावरण पूरक उपक्रमाबद्दल त्यांचा दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, सहशाखा व्यवस्थापक सौ.उषा सारोळे, डॉ. शिवाजीराव जवळगेकर, डॉ. अंजली जोशी, डॉ. बालाजी घुटे, डॉ. संदिपान जगदाळे, डॉ. गोपाल बाहेती, प्रा. शांता कोटे, प्रा. अंजली बनसोडे, प्रा. सुरेश क्षीरसागर, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.

पंढरपूर येथे आषाढी यात्रेच्या निमित्ताची लगबग सर्वत्र सुरू असताना लातूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापिका ज्योती राजे यांनी सायकलीवरून प्रवास करून पंढरपूर वारीचा एक नवा आदर्श घातला आहे. आपल्या टीम सोबत त्यांनी ३ जुलै रोजी पहाटे ४ वाजता प्रवास सुरू केला. २०२ किमीचे अंतर त्यांनी १० तास ४५ मिनिटे पूर्ण केला. आरोग्य प्रति जनजागृती व्हावी तसेच इंधन व पर्यावरणाचे संरक्षण व्हावं, या दृष्टिकोनातून हा आदर्श त्यांनी लातूरकरांना घालून दिला आहे. या स्तुत्य उपक्रमाचे लातूरमध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रसंगीचे सूत्रसंचालन डॉ. संदिपान जगदाळे यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या