26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरसाहेबराव कांबळे यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार प्रदान

साहेबराव कांबळे यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार प्रदान

एकमत ऑनलाईन

लातूर : तालुक्यातील ममदापूर येथील मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्रीराम विद्यालयातील इंग्रजी विषयाचे शिक्षक साहेबराव साधू कांबळे यांना राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या (प्रोटान) येथे झालेल्या दुस-या मराठवाडा विभागीय अधिवेशनात महात्मा ज्योतिबा फुले आदर्श समाजभूषण पुस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे उद््घाटक म्हणून शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे तर अध्यक्षस्थानी ‘प्रोटान’चे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय धाबर्डे होते. यावेळी मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. मोरे, प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, साहेबराव कांबळे यांचे वडील साधू कांबळे, आई काशीबाई कांबळे, मेघराज कांबळे, राजर्षी कांबळे, डॉ. रोहित, मैथिली, उद्योजक अमर वाघमारे, शिक्षक राजकुमार नागरगोजे आदींच्या उपस्थितीत साहेबराव कांबळे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या