37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeलातूर‘सीडीआर’ च्या माहितीनुसार खुनाच्या तपासाला गती

‘सीडीआर’ च्या माहितीनुसार खुनाच्या तपासाला गती

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहरातील विशाल नगर भागातील श्री साईबाबा मंदिर जवळ भर रस्त्यावर बारावीत शिकणा-या रोहन सुरेश उजळंबे (वय १८, रा. लोदगा ता. औसा, ह. मु. मोतीनगर, लातूर) याच्यावर कत्तीने सपासप वार करून गंभीर जखमी करून खुन झाल्याची घटना रविवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली होती. फोनच्या सिडीआर नुसार मिळालेल्या माहिती नुसार पोलिस तपासाला गती देत असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी सांगीतले.

श्री साईबाबा मंदिर जवळ रोहन सुरेश उजळंबे (वय १८, रा. लोदगा ता. औसा, ह. मु. मोतीनगर, लातूर) हा थांबला असता एकाने त्याच्या डोक्यात, उजव्या गलावर, चेह-यावर वर कत्तीने वार करून गंभीर जखमी केले. त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.

या घटनेच्या तपासासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे व एमआयडीसी पोलिस ठाणे यांचे असे दोन पथकांच्याद्वारे तपास सुरू आहे. फोनच्या मिळलेल्या सिडीआर नुसार एका अत्पवयीन मुलाचे आणि रोहन उजळंबे यांचे खुनाच्या पूर्वी चार फोन झाले होते. शेवटचा १४ शेकंदाचा फोन झाला होता. त्यानुसार पोलिस तपासाला गती देत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या