24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरस्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांचा युव्हीका मध्ये सहभाग

स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांचा युव्हीका मध्ये सहभाग

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जेएसपीएम लातूर द्वारा संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय लातूर येथील विद्यार्थ्यांनी इस्रो द्वारा आयोजित यंग सायंटिस्ट प्रोग्राम अर्थात वश्कङअ या अभियानात सहभाग नोंदवला. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्या द्वारा देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी अंतराळविज्ञान, तंत्रज्ञान आणि उपयोगिता याबाबतच्या ज्ञानात वृद्धी व्हावी, तंत्रज्ञानातील नवीनता माहिती व्हावी, तसेच अभियांत्रिकी आणि गणित या विषयात विद्यार्थ्यांनी संशोधन करावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील १५० बाल वैज्ञानिकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हा प्रोग्राम शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. म्हणून स्वामी विवेकानंद विद्यालयातील तनिष्का ढोकळे, रूतूजा कुलकर्णी, काव्या वाडकर, प्रसाद शिंदे आणि हर्षद काळदाते या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला असल्याची माहिती मुख्याध्यापक गोविंद शिंदे यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या