27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरस्व. चिगरी गुरुजींच्या स्मरणार्थ गुरुवंदना

स्व. चिगरी गुरुजींच्या स्मरणार्थ गुरुवंदना

एकमत ऑनलाईन

लातूर : अभिजात शास्त्रीय संगीताचा ज्यांनी प्रचार व प्रसार केला असे थोर कलावंत स्व.पंडित शांताराम चिगरी गुरुजीं व स्व. शकुंतलादेवी चिगरी यांच्या स्मरणार्थ सुरताल संगीत महाविद्यालयाच्या वतीने दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते २ व दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत येथील नवीन रेणापूर नाका परिसरातील विष्णदास मंगल कार्यालयात गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात जगप्रसिद्ध तबलावादक पं. मुकेश जाधव, उत्तम चिगरी, पुणे, पं. अंगद गायकवाड, अहमदनगर, इंडियन आयडॉल अंजली-नंदिनी गायकवाड, जलील पाशा, बेंगलोर, सौरभ नाईक, पुणे, विजय श्रीमंगले आदी गायक व वादकाचे गायन-वादन होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुरताल परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या