29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरहरभरा, तूर पिकाला फटका

हरभरा, तूर पिकाला फटका

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसापासून लातूर जिल्ह्यात कधी पाऊस, तर ढगाळ वातावरणाचा खरीप हंगामातील तूर, रब्बी हंगामातील हरभरा पिकाला, तसेच फळ पिकांनाही फटका बसणार असून उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे.

लातूर जिल्ह्यात ९७२.३ मिमी पाऊस झाला आहे. या पावसाच्या जोरावर शेतक-यांनी खरीप हंगामात जमिनीतील ओलावा पाहून ९४.९४ टक्के म्हणजेच ५ लाख ८१ हजार ४४३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली होती. यात तूरीची ८५ हजार ६०९ हेक्टर पेरणी झाली होती. सध्या तूरीचे पीक कांही ठिकाणी फुलो-यात आहे. तर कांही ठिकाणी शेंगा परिपक्व होत आहेत.
तसेच रब्बी हंगामात १ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभ-याचे पीक कांही ठिकाणी फुलो-यात आहे. गेल्या कांही दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण, तसेच लहान, मोठा पाऊस होत असल्याने त्याचा फटका तूर व हरभरा या पिकांना बसत आहे. पीक हातात येण्याच्या पूर्वीच शेतक-यांच्या समोर नवे संकट उभा राहिले आहे. त्यामुळे पिकाला संरक्षण देण्यासाठी पिकांची फवारणी करणे आवश्यक आहे.

कीटक नाशक, बुरशी नाशकाची शेतक-यांनी फवारणी करावी
लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुरीचे व हरभ-याचे पीक घेतले जाते. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे व पावसामुळे तूरीवर व हरभ-यावर किड रोगाचा व बुरशी रोगाचा प्रार्दुभाव होतो. तसेच गेल्या चार दिवसापूर्वी झालेल्या दुहीचाही परिणाम या पिकांवर होतो. त्यामुळे सध्या तुरीच्या फुलो-याचा बहर आणि वाढीस लागलेल्या शेंगा सुरक्षीत करण्यासाठी, तसेच कांही ठिकाणी हरभ-याचे पीक फुलो-यात येत आहे. ते टिकवण्यासाठी शेतक-यांनी इमामेकटीन बेंझोयट किंवा टाकुमी या दोन्ही पैकी एका कीटक नाशकाची निवड करावी. बुरशीजन्य रोगासाठी रिडोमिल गोल्ड किंवा रोको या दोन्ही पैकी एका पुरशी नाशकाची निवड करावी. कीटक नाशकाच्या सोबत बुरशी नाशक मिसळून तूर व हरभरा पिकावर फवारणी करावी. यामुळे तूर व हरभ-यावरील किडीचा व बुरशीचा प्रार्दुभाव कमी होतो, अशी माहिती लातूर कृषि महाविद्यालयाचे प्रा. अरूण गुट्टे यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या