36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeलातूरहवा गुणवत्ता निर्देशांक गंभीर

हवा गुणवत्ता निर्देशांक गंभीर

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
शहर तसेच जिल्ह्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक गंभीर स्थितीत असून यामुळे श्वसनाचे आजार वाढू शकतात. त्यासाठी शहरातील नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी,असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. श्वास घेण्या योग्य तरंगणारे कण अतिप्रमाणात वाढल्यामुळे पुढील काही दिवस हवा गुणवत्ता निर्देशांक गंभीर स्थितीत असणार आहे. मंगळवारीही (दि. २५ जानेवारी) लातूर शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३०० पेक्षा अधिक होता. निलंगा शहरात ३६६,अहमदपूर शहरात ४९५, शिरुर आनंतपाळ शहरात ४६१, देवणी शहरात ४९९ व जळकोट शहरातही हवा गुणवत्ता निर्देशांक ४९९ पेक्षा अधिक आढळला. ही परिस्थिती अतिश्य गंभीर आहे.

थंडीची लाट असल्यामुळे हवेतील धुळीचे कण जमिनीकडे आकर्षित होतात. पुढील तीन दिवसात ही परिस्थिती वाढत जाऊ शकते. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या काळात श्वसना संदर्भातील आजार वाढू शकतात. ज्यांना ब्रॉन्कायटिस, अस्थमा यासारखे आजार आहेत अशा व्यक्तींनी जास्त काळ घराबाहेर राहू नये. प्रत्येकाने मास्क वापरावा. वयस्कर व्यक्तींनी कोमट पाणी प्यावे. दुचाकीवरुन जाणा-या व्यक्तींनी मास्कसह डोळ्याला चष्मा वापरावा. सतत गुळण्या कराव्यात, डोळे स्वच्छ करावेत, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या