22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरहासोरीत भूगर्भातील आवाजामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण

हासोरीत भूगर्भातील आवाजामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण

एकमत ऑनलाईन

निलंगा : तालुक्यातील हासोरी (बु) गावात दि ७ सप्टेंबर मंगळवार रोजी रात्री १०.१२ वाजेच्या सुमारास भूगर्भातून अचानक जोराचा आवाज झाल्याने लोक भूकंपाच्या भीतीने काही क्षणातच रस्त्यावर आले. जमीन हादरत असल्याचे लक्षात येताच सुरक्षितस्थळी जाण्यासाठी सर्वांचीच धावपळ उडाली. येथील नागरिक दररोजच्या प्रमाणे रात्री दहा वाजण्याच्या नंतर झोपण्याची तयारी करीत असताना सव्वा दहाच्या सुमारास भूगर्भातून अचानक जोरदार हादरे सुरू झाले. काही तरी जमिनीखालून जात असल्याचा भास होत असल्याने अनेकांनी आरडा ओरड सुरू केली .

सर्व नागरिक तात्काळ आपापल्या अंगणात सुरक्षित स्थळी थांबले. या भागात सन १९९३ च्या किल्लारी भुकंपाच्या आठवणी कायम असतात. त्याच भीतीमुळे नागरीकांनी घराबाहेर रात्र जागून काढली. बुधवारी सकाळी तहसीलदार सुरेश घोळवे यांनी हासोरी येथे भेट देऊन नागरिकांशी चर्चा करून त्यांना धीर दिला. याबाबत तहसीलदार घोळवे यांच्याशी विचारणा केले असता म्हणाले की, जिल्ह्यात भूकंपाची नोंद झाली नाही. येथील नागरिकांना जाणवले आवाज हा पर्यावरणातील बदलामुळे असू शकतो त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या